Tharla Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, इकडे सायली अर्जुनचं मनं कसं जिंकायचं यासाठी प्रयत्न करत असते. तर एकीकडे अर्जुनचेही सायलीचं मन जिंकण्यासाठी आणि सायलीला मनातलं सांगण्यासाठी धडपड सुरु असते. अर्जुन चैतन्य समोर एक युक्ती सुचवतो आणि सांगतो की, मी त्यांना एक प्रेम पत्र लिहून ठेवलं आणि जर ते प्रेम पत्र वाचून त्या हसल्या तर समजायचं की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि जर त्या हसल्या नाही तर समजायचं की आपल्याला हे प्रयत्न आणखीन सुरु ठेवायचे आहेत’, असं म्हणतो आणि चैतन्य त्याला प्रेम पत्र लिहिण्यासाठी मदत करताना दिसतो. एकीकडे सायली अर्जुनचं मन जिंकण्यासाठी त्याला आवडणारी बिस्किट बनवण्याचा निर्णय घेते आणि खास बिस्किटांचा बेत आखते.
तेव्हा मधु भाऊ आणि पूर्णा आजी सुद्धा तिथे येतात आणि सांगतात की, तू इतकी धावपळ का करत आहेस. यावर सायली सांगते, ‘मी सगळ्यांसाठी बिस्किट बनवत आहे’. यावर पूर्णा आजी सायली जवळ तक्रार करतात की, ‘गेल्या वेळेला तू मला एकच बिस्किट दिलं होतंस कारण ते साखरेचं होतं पण यावेळी अस चालणार नाही. यावेळी सायली पूर्णा आजी आणि मधु भाऊंसाठी बिना साखरेची बिस्किट बनवत असते. तर त्याच वेळेला प्रतिमा सुद्धा सुभेदारांच्या घरी आलेली असते. तेव्हा प्रतिमा सायलीला सतत किचनमध्ये काम करताना पाहून तिच्या मदतीला जाते.
तेव्हा प्रतिमाला ती सांगते की, ‘तुम्ही बसा मी सगळं काही व्यवस्थित करेल’. यावर मधु भाऊ आणि पूर्णा आजी सुद्धा सायलीचं कौतुक करतात. तर इकडे प्रिया व अस्मिता सायली व अर्जुनचे नेमकं काय सुरु आहे हे पाहण्यासाठी धडपड करत असतात. आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, अर्जुन सायलीला पत्र लिहत असतो. तेव्हा चैतन्य सांगतो की, ‘तू आय लव यू सायली’ असे पत्रात लिह आणि थेट सवाल कर. आता अर्जुन पत्रात काय लिहिणार.
सायलीच्या हातात पत्र आल्यानंतर सायलीला धक्का बसेल का?, प्रिया आणि अस्मिता या चिट्टी प्रकरणात डोकावत काही अदलाबदल तर करणार नाही ना?, हे सारं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.