Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत खूप मोठी रंजक वळणं येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत अनुष्काच्या एण्ट्रीने नवं वादळ आलेलं पाहायला मिळत आहे. मालिकेत पारुबाबत अनुष्काने केलेलं वक्तव्य हे अहिल्यादेवींना खटकलेलं आहे. अहिल्यादेवी अनुष्कावर प्रचंड संतापलेल्या असतात. माफी मागायलाही त्या तिला मुदत देतात मात्र अनुष्का त्यांची माफी न मागता त्यांचा आशीर्वाद घेतला असल्याचं म्हणते. आणि मी हरले नाही असंही सांगते. यावर अहिल्यादेवी अनुष्काला म्हणतात, “तुला मी एक संधी दिली होती; पण ती तू गमावलीस. आता पुढे जे काही होईल, त्या परिणामांना सामोरी जायला तयार राहा.” त्यानंतर अनुष्का पारूजवळ जाते आणि तिला म्हणते, “पारू माझी शंका खरी ठरली. तुझी भक्ती आणि तुझी देवीआई दोघीही आंधळ्या आहात. देव तुमच्या दोघींनाही सारासार विचार करण्याची बुद्धी देवो”, असे म्हणून अनुष्का निघून जाते.
त्यानंतर अहिल्यादेवी किर्लोस्कर मोहनला फोन करते आणि सांगते, “मोहन आपण जे अनुष्काच्या बाबतीत करायचं ठरवलं होतं. गो अहेड. आता ती पूर्ण उद्ध्वस्त होईपर्यंत मी थांबणार नाही”. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अनुष्का निघून गेल्यानंतर पारू, आदित्य, प्रीतम आणि प्रिया सगळेजण बोलत असतात. अनुष्काचा असा अपमान झालेला पाहून आदित्यला फार वाईट वाटतं. त्यामुळे आदित्य अनुष्काची समजूत काढण्यासाठी आणि तिला भेटण्यासाठी म्हणून तिच्याजवळ जायचं ठरवतो. आणि हे सगळं त्यांचं बोलणं दामिनी रूमबाहेर उभे राहून ऐकत असते. आदित्य अनुष्काला भेटायला जातो तेव्हा दामिनी आदित्यची चुगली अहिल्यादेवींकडे करते. तेव्हा अहिल्यादेवींचा पारा आणखीनच चढतो.
आणखी वाचा – Bigg Boss OTT 2 फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाली, “माफ करा…”
आदित्यची एवढी हिंमतच कशी झाली असं म्हणत त्या आदित्यला फोन करतात आणि तू कुठे आहेस असे विचारतात. यावर अहिल्यादेवींना आदित्य काही खोटे सांगत नाही. तो सांगतो की, ‘मी आता अनुष्का बरोबर जेवण करत आहे’. हे ऐकल्यावर अहिल्यादेवी त्याला ताबडतोब घरी बोलावतात. यावर आदित्य अहिल्यादेवींना सांगतो की, ‘जेवणाचा अपमान होऊ नये म्हणून मी संपूर्ण जेवण करुनच निघतो’. मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, आदित्य घरी येताच पारू त्याला गेट जवळ अडवते आणि विचारते की, ‘तुम्ही तिकडे का गेला होतात?, अनुष्का मॅडम चांगल्या आहेत हे मला सुद्धा माहित आहे पण तुम्ही तुमच्या आईच्या विरोधात कसे जाऊ शकता’, असा प्रश्न आदित्यला करते. त्यानंतर सकाळी सगळेचजण डायनिंग टेबलवर जमलेले असतात. तेव्हा आदित्य अहिल्यादेवींची माफी मागतो आणि सांगतो की, ‘तुला हे आवडलेलं नाहीये पण मला तुझा कोणताच अपमान करायचा नव्हता किंवा तुझ्या विरोधात जायचं नव्हतं’.
इतक्यातच तिथं अनुष्काची एन्ट्री होते आणि अनुष्का सांगते की, ‘तो मला भेटायला आला होता’. हे ऐकताच सगळेजण अनुष्काकडे पाहत राहतात. अनुष्का येऊन पुन्हा कोणता तमाशा करणार हे सारं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.