मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी ही अभिनय क्षेत्रात सक्रीय असतानाच सामाजिक भानही जपतात. सोशल मीडियाद्वारे अनेकदा सामाजिक व राजकीय प्रश्नांना ते वाचा फोडत असतात. सोशल मीडियाचा योग्य वापर करीत ही मंडळी अनेक विषयांवर भाष्य करत असतात. मराठी मनोरंजन सृष्टीतील सामाजिक भान जपणाऱ्या अशा काही कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे अभिनेत्री गौतमी देशपांडे. मुंबईतील ट्रॅफिकची समस्या हा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आहे. इतकच नव्हे तर अगदी सामान्यांपासून ते मोठे कलावंत कायमच या सगळ्यावर भाष्य करत असतात. अनेकांना या ट्रफिकच्या समस्येमुळे बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो. याच ट्रॅफिकवर आता गौतमीने भाष्य केलं आहे. (Gautami Deshpande On Mumbai Traffic)
‘माझा होशील ना’ मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे नेहमी चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कधी आपले फोटो तर कधी आपले व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तसंच आजूबाजूच्या घडामोडींवर देखील भाष्य करत असते. नुकताच तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गौतमीने मुंबईच्या ट्रॅफिकमधील एक कृती पाहून संताप व्यक्त केला आहे. गौतमीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि मुंबईतील ट्रॅफिकबद्दल व त्या ट्रॅफिकमधून नियम मोडत वाट काढणाऱ्यांना तिने बेअक्कल असं म्हटलं आहे.
आणखी वाचा – Bigg Boss OTT 2 फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाली, “माफ करा…”
या व्हिडीओमध्ये गौतमीने असं म्हटलं आहे की, “मी आता बीकेसी ते विलेपार्लेला जोडणारा जो उड्डाणपूल आहे, तिथे होते आणि पुढे खूप ट्रॅफिक आहे. तर आपल्याकडे काय पातळीची हुशारी आहे. लोकांनी त्या उड्डाणपुलावर यू-टर्न घेतले. अत्यंत वेगाने जिथून गाड्या जात आहे, अशा ठिकाणाहून ते उलटे वन-वे येत आहेत. या अशा लोकांवर काही कारवाई होतं नाही का? किंवा काही केलं जात नाही का? मला काही कळतं नाही. कारण ते अत्यंत रासरोसपणे उड्डाणपुलावरून यू-टर्न घेऊन मागे गेलेले आहेत. ज्यामुळे अपघात होऊ शकतो किंवा अनेक गोष्टी होऊ शकतात”.
आणखी वाचा – 26 November Horoscope : मेष, तूळ, मकर यासह सर्व राशींसाठी मंगळवारचा दिवस आहे फारच विशेष, जाणून घ्या…
यापुढे गौतमीने असं म्हटलं आहे की, “आपल्याला माहिती आहे ना, मुंबईत ट्रॅफिक आहे. तर ट्रॅफिकमध्ये थांबायचं. हा मुर्खपणा करायचा नाही. असं करणारे तुम्ही बेअक्कल लोक आहात”. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कमी मतदान झाल्याबद्दलही तिने पोस्ट शेअर केली होती. कमी मतदानाबद्दल अभिनेत्रीने नाराजी व्यक्त केली होती आणि आता तिने ट्रॅफिकबद्दल आपला संताप व्यक्त केला आहे.