टेलिव्हिजन विश्वातील सर्वात आवडते जोडपे प्रिन्स नरुला व त्याची पत्नी युविका चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी चाहत्यांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर केली होती. लग्नाच्या ६ वर्षानंतर प्रिन्स व युविका यांनी आई-बाबा होणार असल्याची खुशखबर सांगितली. युविकाने (१९ ओक्टोबर, शनिवार) रोजी मुलीला जन्म दिला. लग्नानंतर सहा वर्षांनी चिमुकलीच्या आगमनामुळे त्यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. अशातच आता या जोडप्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनात सर्व काही ठीक नसल्याचं बोललं जात आहे. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. (Prince Narula and Yuvika Chaudhary Marriage Rumours)
प्रिन्स आणि युविकाच्या वैवाहिक जीवनात सर्व काही ठीक नसल्याचं बोललं जात आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओही व्हायरल होत असून त्यावर त्यांच्या चाहत्यांनी वेगवेगळे निष्कर्ष बांधले आहेत. झी न्यूजच्या रिपोर्टनुसार, युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला यांच्या संसारात काही अडचणी आल्या आहेत. युविकाने २४ नोव्हेंबरला प्रिन्सच्या वाढदिवसानिमित्त एकही पोस्ट शेअर केली नाही. तर प्रिन्सनेसुद्धा फक्त आपल्या मुलीबरोबरचे फोटो शेअर केले. यानंतरच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याआधी प्रिन्सने त्याच्या व्लॉगमध्ये युविकाच्या डिलिव्हरीची माहिती नसल्याचे सांगितले होते. मात्र, या अफवांवर त्याच्या बाजूने कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. युविकाने नुकतीच सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली होती. त्यात तिने भगवान शिव शंकर आणि पार्वतीचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोसह तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “मला तुमच्याकडून हेच हवे आहे. विश्वास, आदर, काळजी आणि प्रामाणिकपणा”. तर तिच्या दुसऱ्या पोस्टमध्ये तिने गर्व, पैसा, सत्ता आणि अहंकार यांचा उल्लेख केला आहे.
आणखी वाचा – Bigg Boss OTT 2 फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाली, “माफ करा…”
दरम्यान, ‘बिग बॉस ९’पासून युविका व प्रिन्स यांच्या प्रेमाची सुरुवात झाली. प्रिन्स युविकापेक्षा सात वर्षांनी लहान आहे. युविका ४० वर्षांची असून प्रिन्स ३३ वर्षांचा आहे. ‘बिग बॉस’मध्ये प्रेमात पडल्यानंतर काही वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केले आणि मग २०१८ साली दोघांनी लग्न केलं. अशातच लग्नाच्या सहा वर्षांनी या दोघांनी मुलीला जन्म दिला आहे. पण आता त्यांच्यामध्ये काही आलबेल नसल्याचे समोर येत आहे.