Tharla Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, सायलीकडून अर्जुनला घटस्फोटाची नोटीस आलेली असते. हे पाहून अर्जुनसह घरातील सगळ्यांना धक्का बसतो. इतकंच नव्हे तर सायलीला सुद्धा घटस्फोटाच्या नोटीसबद्दल जाणून घेऊन खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन याबाबत विचारतो तेव्हा सायली सांगते की, ‘मी घटस्फोटाची नोटीस तुम्हाला पाठवलेलीच नाहीये’. मात्र सायलीने सांगून सुद्धा अर्जुन तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नसतो. अर्जुन सायलीला रागात म्हणतो की, ‘तुम्हाला मी डोळ्यासमोर नको होतो तर मला सांगायचं होतं आणि आपला करार संपल्यावर मी तुम्हाला स्वतःच जा म्हणून सांगितलं असतं’.
यावर सायली अर्जुनला उत्तर देत म्हणते की, ‘आपण लग्नापूर्वीच घटस्फोटांच्या पेपरवर सह्या केल्या आहेत. मग मी तुम्हाला पुन्हा नवीन पेपर्स का पाठवेन. मी तुम्हाला तेच पेपर पुढे केले असते’. हे ऐकून अर्जुन शांत होतो. चैतन्य ही अर्जुनची समजूत काढतो. तर एकीकडे पूर्णा आजी हे प्रकरण पाहून नाटक करतात. सायली अर्जुनपासून दूर जाऊ नये म्हणून त्या छातीत दुखत असल्याच नाटक करतात. तेव्हा पूर्णा आजी सांगतात की, मी या दोघांना वेगळे होताना पाहू शकत नाही. त्यामुळे मला आत्ताच मरण आलेलं चांगलं.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : अहिल्यादेवींची तब्येत बिघडणार, या सगळ्याला पारू ठरणार का जबाबदार?, मोठा ट्विस्ट
हे ऐकल्यावर सायली पूर्णा आजीला शांत करते आणि सांगते की, मी अर्जुन आणि तुम्हाला सोडून कुठे जाणार नाहीये आणि मी ती घटस्फोटाची नोटीस पाठवली नव्हती. मी तुम्हा सगळ्यांबरोबर आनंदी आहे’. यानंतर अर्जुन सायली एकत्र असतात तेव्हा तो विचारतो की, ‘तू साने वकिलांकडे गेली होतीस का?’. यावर सायली नाही असं सांगते. तेव्हा सायलीच्या लक्षात येते की, पण माझ्यासारखी सही या पेपर्सवर केली आहे म्हणजे ती नक्कीच प्रियाने केली असावी. तीच माझी सेम टू सेम सही करू शकते.
आणखी वाचा – Bigg Boss नंतर जान्हवी किल्लेकर पहिल्यांदाच गेली माहेरी, आईने औक्षण करत केले स्वागत, व्हिडीओ व्हायरल
यानंतर मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, प्रिया सुभेदाराच्या घरी आलेली असते, तेव्हा प्रियाच्या ती सणसणीत कानाखाली मारते आणि सांगते की, तु आम्हाला वेगळं करू शकत नाहीस. आम्ही साता जन्मीसाठी एकत्र आलो आहोत. त्यामुळे आम्हाला वेगळं करण्याचा विचारही करु नकोस’.