Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, दिवाळी निमित्त किर्लोस्कर मेंशनमध्ये तयारी सुरु असते. त्याच वेळेला अहिल्यादेवींची तब्येत अचानक बिघडल्याने सर्वजण काळजी व्यक्त करत असतात. अहिल्यादेवी देवघरातली पूजा बाकी आहे असे म्हणतात तेव्हा प्रिया पूजा करायला देवघरात जाते. अहिल्यादेवींना बरं नसल्याने या घराची सून म्हणून प्रियालाच देवघरात जाऊन पूजा करणं भाग असतं. त्याच वेळेला तिथे पारू येते. पारू प्रियाला तुम्ही तुम्हाला हवी तशी पूजा करा असं सांगते. तर दामिनी येऊन पारुला खडेबोल सुनावत म्हणते की, ‘तुम्ही नोकर माणसं आहात आम्ही काय करायचं आणि काय नाही याबद्दल तुम्ही आम्हाला शिकवू नका’. त्यानंतर दामिनी येऊन प्रियाचे कान भरण्याचा प्रयत्न करते.
प्रियाला सांगते की, ‘तू या घरातली दुसरी दामिनी होऊ नकोस. या घरात फक्त अहिल्यादेवी आणि आदित्य यांचा शब्द चालतो. बाकी इथे दादासाहेब, माझा नवरा मोहन, प्रीतम हे सगळे त्यांचे गुलाम आहेत. हे ऐकल्यावर प्रियाला काहीच कळत नाही. दामिनी सांगते की, ‘आता देखील कंपनीच्या महत्त्वाच्या मीटिंगसाठी आदित्यला पाठवलं आहे आणि कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्यासाठी प्रीतमला हा दुजाभाव अहिल्यादेवी पहिल्यापासून करत आल्या आहेत’. हे ऐकल्यावर प्रियाला कुठेतरी वाईट वाटतं. त्यानंतर तिथे प्रीतम येतो तेव्हा प्रीतम सांगतो की, ‘जरा माझ्याशी बसून बोलत जा’. यावर प्रिया म्हणते की, ‘तुमच्याशी बसून बोलायला मला खूप काम आहेत. तुम्हाला काही काम नाहीत का?’.
आणखी वाचा – Bigg Boss नंतर जान्हवी किल्लेकर पहिल्यांदाच गेली माहेरी, आईने औक्षण करत केले स्वागत, व्हिडीओ व्हायरल
यावर प्रीतम सांगतो, ‘मला काय काम असणार तिकडे दादा कामासाठी गेला आहे तो सांगेल तेव्हाच मला काम असतं’. हे ऐकल्यावर प्रियाला थोडसं चुकल्यासारखंच वाटतं. त्यानंतर प्रिया सांगते की, ‘जसे मोहन काका, आदित्य सर ऑफिसला जातात तसे उद्यापासून तुम्ही सुद्धा कामाला जा’. यावर प्रीतम सांगतो की, ‘मला कामाला जायची काय गरज आहे. तिकडे दादा सर्व काही बघतोय’. तेव्हा प्रिया सांगते की, ‘तुम्ही सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहात. त्यामुळे तुम्हाला सुद्धा कामावर जाणं तितकंच गरजेचे आहे आणि तुम्हाला सुद्धा सगळ्या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे’. हे ऐकल्यावर प्रीतमला कळत नाही की प्रिया नेमकं असं का बोलत आहे. त्यानंतर पारूचा फोन लागत नाही म्हणून मोहन दामिनीला फोन करुन सांगतो की, ‘अहिल्यादेवींची तब्येत ही खूपच नाजूक आहे त्यामुळे त्यांना थोड्या थोड्या वेळाने काहीतरी खायला द्या’.
त्याच वेळेला दामिनी मुद्दाम गुरुजींचा फोन आला असे सांगून अहिल्यादेवींना त्यांच्या तब्येतीसाठी न खाता पिता व्रत करावा लागेल असं बोलते, ते पारु ऐकते. आणि मग पारू अहिल्यादेवींना खाण्यापासून रोखते. आता पारूमुळे अहिल्यादेवींची तब्येत बिघडणार का?, दामिनी या सगळ्याचा आठ पारूवर टाकणार का?, हे सारं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.