दिवाळीचा सण हा माहेरवाशीनींसाठी महत्त्वाचा सण असतो. या सणासाठी अनेक माहेरवाशीणी आपली माहेरी जातात. माहेरी त्यांचे कोडकौतुक केले जाते. सासरच्या काही जबाबदाऱ्यांमधून माहेरी निवांत क्षण अनुभवण्यासाठी या माहेरवाशीणी जातात. अशीच ‘बिग बॉस मराठी ५’ फेम एक माहेरवाशीण सध्या दिवाळीच्या सणानिमित्त तिच्या माहेरी गेली आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे जान्हवी किल्लेकर. अनेक मराठी मालिकांमधून लोकप्रिय झालेली जान्हवी ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झाली आणि तिच्या लोकप्रियतेत आणखीनच वाढ झाली. ‘बिग बॉस’च्या घरात सुरुवातीच्या दिवसांत सर्वांना राग येणाऱ्या जान्हवीवर नंतर मात्र सगळे प्रेम करू लागले. ‘बिग बॉस’च्या घरात ती टास्क-क्वीन म्हणून ओळखली जाऊ लागली. (Janhavi Killekar Homecoming Video)
‘बिग बॉस’च्या घरात इतरांना अपमानास्पद देणाऱ्या जान्हवीला नंतर मात्र तिची चूक उमगली. तिने पॅडी कांबळेंची माफी मागितली. वर्षा उसगांवकरांबरोबरही तिने चांगले संबध राखले. ‘बिग बॉस’च्या घरात तिने टास्कसाठी सगळ्या गोष्टी केल्याची कबुली दिली. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या सुरुवातीला व्हिलन ठरलेली जान्हवी आता हिरोईन झाली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ती आता सर्वांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. अभिनेत्री नुकतीच दिवाळीच्या सणानिमित्त तिच्या माहेरी पेणला गेली आहे आणि यावेळी तिचे हटके स्वागत करण्यात आले. याची झलक तिने शेअर केली आहे.
आणखी वाचा – 05 November Horoscope : मेष, मिथुन व कन्या राशीच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस आनंदात जाणार, जाणून घ्या…
जान्हवीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये तिची आई तिचे स्वागत करतानाचे पाहायला मिळत आहे. पाय धुत आणि औक्षण करत जान्हवीच्या आईने तिचे घरात स्वागत केले आहे. यानंतर जान्हवीनेही आपल्या आईच्या पाया पडल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी तिचा लेकही तिच्याबरोबर होता आणि जान्हवीच्या आईने त्याचेही स्वागत केले. पुढे जान्हवीच्या लेकही तिच्या आईच्या पाया पडला.
जान्हवीने हा खास व्हिडीओ शेअर करत माहेरी स्वागत असं म्हटलं आहे. तिने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. जान्हवीच्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत तसा प्रतिसाददेखील दिला आहे. दरम्यान, जान्हवी आता कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे? याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.