Tharla Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, इथे सुभेदारांच्या घरी प्रियाची एंट्री झालेली असते. प्रतिमामुळे प्रिया सुभेदारांच्या घरात पाऊल टाकू शकते. प्रतिमाची परवानगी घेऊन आणि योग्य ती संधी साधून प्रियाने सुभेदारांच्या घरात प्रवेश केलेला असतो. सुभेदारांच्या घरात येताच प्रियाचं कोणीच स्वागत करत नाही व तिच्याशी कोणीच बोलतही नाही. यावर प्रिया सांगते की, ‘मी इतकी मोठी काय चूक केली आहे की माझ्याशी कोणीच बोलत नाहीये’. त्यावर अस्मिता प्रियाला समजावून सांगते की, ‘मी आहे ना, तू कसलीच काळजी करु. नको चल आपण आपल्या रुममध्ये जाऊया’, असं म्हणून त्या दोघी रुममध्ये जातात.
तर रविराजच्या फोनवरुन प्रतिमा प्रियाला फोन करते आणि सांगते की, ‘तुझ्या बाबांना तू तिकडे गेलेलं आवडलं नाहीये. तू ताबडतोब घरी निघून ये’. यावर प्रिया सांगते की, ‘पण तुझ्या परवानगीनेच मी इथे आले आहे. तू बाबांना सांग ना’. यावर रविराज तो फोन घेतो आणि प्रियाला चांगलाचं सुनावत सांगतो की, ‘तिथे तू गेली आहेस आणि तिथेच काय घोळ घातलास तर याद राख’. त्यानंतर प्रतिमा रविराजला शांत करते आणि सांगते की, ‘तिला तिच्या जबाबदाऱ्या कळू द्या. तिला तिच्या चुका समजून घेऊ द्या. प्रत्येक वेळेला आपण तिथे जायला नको’, असं म्हणते. यावर रविराजही शांत होतो. तर इकडे सायली बॅग भरत असते.
तेव्हा अर्जुनला असं वाटतं की, आता मधु भाऊंची सुटका झाली आहे म्हणून सायली मधु भाऊंबरोबर निघून जात आहे. मात्र सायली सांगते की, काही ठेवणीतल्या साड्या आहेत त्या मी या बॅगेत भरुन ठेवत आहे. हे ऐकल्यावर अर्जुनला दिलासा मिळतो. त्यानंतर अर्जुन सांगतो की, ‘मला वाटलं तुम्ही हे घर सोडून जात आहात. तुम्ही हे घर सोडून जाऊ नका. मला आता तुमची सवय झाली आहे. लग्नापूर्वीचं मला काहीच आठवत नाहीये. आता तुम्ही माझ्या डोळ्यासमोर असता हेच मला आठवतंय’, हे ऐकल्यावर सायलीलाही खूप बरं वाटतं. अर्जुन पुढे काही बोलणार इतक्यात स्वतःला सावरतो आणि म्हणतो की, ‘आता अजून काही म्हणालो तर सायलीला वाईट वाटेल म्हणून तो काहीच बोलत नाही’. तर इकडे महिपत आणि साक्षी यांचा राग अनावर झालेला असतो. अर्जुनला दिलेल्या सुपारीत त्याच्या माणसाकडून चूक होते. तेव्हा महिपतचा राग अनावर होतो आणि तो त्या माणसांना शिक्षा देत असतो. साक्षी सुद्धा काळजी व्यक्त करते की, ‘अर्जुनने त्या बाईला खोटं सिद्ध केलं आहे आता तो मी हा खून केला असल्याचं देखील सिद्ध करेल. शिवाय त्याने मधु भाऊंना सुद्धा सोडवलं आहे’, अशी काळजी दोघेही व्यक्त करताना दिसतात.
तर इकडे सायली व अर्जुन बोलत असतात तेव्हा अर्जुन सायलीला एकच सांगत असतो की, ‘तुम्ही हे घर सोडून जाऊ नका आता तुम्ही पूर्णा आजीला सुद्धा शब्द दिला आहे की, तुम्ही हे घर सोडून कधी जाणार नाही त्यामुळे तुम्ही इथेच राहा’, दोघांचं बोलणं सुरु असताना तिथे प्रिया येते. प्रियाला पाहून अर्जुनचा राग अनावर होतो आणि अर्जुन सांगतो, ‘तू इथे काय करतेय. तुला इथे येण्याची कोणी परवानगी दिली’. यावर सायलीही प्रियाला म्हणते की, ‘तू आता हजार चुका करुन माफी मागितली तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही’.