Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, एकीकडे किलोस्कर घराला धडा शिकवण्यासाठी मालिकेत खलनायकाची एन्ट्री झालेली आहे. अनुष्काच्या एण्ट्रीने किर्लोस्कर कुटुंब जरी आनंदी असलं तरी ही व्यक्ती या घरासाठी घरातल्या लोकांसाठी किती धोकादायक आहे हे अद्याप समोर आलेलं नाहीये. दरम्यान मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अनुष्काने आणलेल्या महागड्या पेंटिंगवर पारूचा तोल जाऊन चहा पडतो आणि ते पेंटिंग खराब होतं. त्यावर अहिल्यादेवी पारुला सुनावतात त्यानंतर अनुष्का सगळ्यांच्या मनात घर करत सगळ्यांची मन जिंकताना दिसते.
निरोप घेताना आदित्यही अनुष्काला गाडीपर्यंत सोडायला जातो. तर अनुष्का जाता जाता संपूर्ण किर्लोस्कर कुटुंबाला घरी जेवण करायला बोलावते. आदित्य सोडायला गेलेला असताना अनुष्काचं कौतुक करतो आणि तिला साईड हग करुन गाडीत बसवतो. एकीकडे अनुष्का तिचा डाव साध्य करण्यासाठी आलेली असते त्यामुळे किर्लोस्कर कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याच्या मनात घर करणं हे तिचं कामच असतं. तर अनुष्काला सोडल्यानंतर इकडे आदित्य पारूच्या घरी जातो आणि पारूला विचारतो की, तुला काही लागलं नाही ना?, तुला ती बांगडीची काच लागली तर नाही ना?, तू ठीक आहेस ना?, असं म्हणत पारूजवळ काळजी व्यक्त करतो.
शिवाय मारुतीही पारुला समजावून सांगतो की, जपून सांभाळून काम करत जा. पायाखाली बघून चालत जा. तर इकडे घरी आल्यावर आदित्यला अहिल्यादेवी विचारतात की, तुला कोणती मुलगी पसंत आहे. मी तुझ्यासाठी काही फोटोज काढले आहेत यावर आदित्य सांगतो, ‘आई तू ज्या मुलीशी लग्न करायला सांगशील त्या मुलीशी मी लग्न करायला तयार आहे’, असं म्हणून तो एका फोटोवर हात ठेवतो. तर तो नेमका फोटो अनुष्काचा असतो. यावर अहिल्यादेवी म्हणतात, ‘आम्हाला सुद्धा ही मुलगी आवडली आहे. तिच्याशी बोलणं करायचं का?’. हे ऐकल्यावर आदित्य काहीच बोलत नाही. त्यानंतर तो रूममध्ये जातो आणि त्याच्या आवडणाऱ्या डोळ्यांशी बोलू लागतो. तितक्यात तिथं प्रीतम येतो आणि आदित्यला चिडवू लागतो. त्याच वेळेला तिथे पारू सुद्धा येते. प्रीतम पारुला म्हणतो की, आज तर दादाने त्या मुलीला हग सुद्धा केलं’, यावर प्रीतम पारुला म्हणतो की, ‘म्हणूनच तू आज नाराज आहेस का?’, असं म्हणत तिची गंमत करतो.
तर आदित्य ही गंमत बघतच बसतो. अहिल्यादेवींनी अनुष्काला आदित्यसाठी बायको म्हणून स्वीकारलेलं असतं, ही गोष्ट सावित्री येऊन पारुला सांगते आणि पारूला म्हणते, ‘आता या मंगळसूत्राचं तू काय करणार आहेस?’. मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, पारू आदित्यच्या रूम मध्ये येते आणि म्हणते, ‘आता तुमचं लग्न होणार आहे. तुम्ही त्या अनुष्का मॅडमला पसंत केलं आहे’. यावर आदित्य सांगतो की, ‘लग्नाचा विचार तरी मी कसा करु शकतो. आपलं लग्न झालं आहे. जगासमोर आपण सात फेरे घेतले आहेत’, असं काहीतरी बरळत असतो. हे ऐकून पारुला धक्का बसतो. आता हे स्वप्न तर नसेल ना हे सारं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.