Ranveer Singh Mother : बॉलिवूड सिनेसृष्टीतील लाडक्या जोडींपैकी एक म्हणजे रणवीर सिंग व दीपिका पदुकोण. बी टाऊनमधील ही जोडी नेहमीच चर्चेत असते. बी टाऊनमधील या जोडीला प्रेक्षकांचंही भरभरुन प्रेम मिळालं. रणवीर व दीपिका हे त्यांच्या लेकीच्या जन्मानंतर बरेच चर्चेत असलेले पाहायला मिळाले. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचे २०१८ साली लग्न झाले. त्यांनतर ८ सप्टेंबर २०२४ रोजी ते त्यांची लेक दुआचे पालक झाले. आता दुआ तीन महिन्यांची झाली आहे. रणवीरची लेक तीन महिन्यांची होताच रणवीरच्या आईने म्हणजेच दीपिकाच्या सासूने असे काही केले, ज्याचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. नातीसाठी तिच्या आजीने जे काही केले ते खूप वाखाणण्याजोगं आहे. आणि तिच्या कृतीची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
नात दुआ तीन महिन्यांची होताच रणवीरची आई अंजू भवनानीने तिचे केस दान केले होते. त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर काही फोटो व पोस्ट शेअर केल्या आहेत. रणवीर सिंगच्या फॅन क्लबने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर हे शेअर केले आहे. रणवीरच्या आईने एक चिठ्ठीही लिहिली आहे, ज्यामध्ये तिने म्हटले आहे की तिचे केस दान करुन, तिला आशा आहे की कदाचित अशा लोकांना मदत होईल ज्यांना यावेळी अडचणी येत आहेत.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : मोहनचा अपघात घडवून आणण्यात अनुष्काची चाल, पारूसमोर येणार का सत्य?, मोठा ट्विस्ट

तर एका पोस्टमध्ये ती केस कापतानाही दिसत आहे. यानंतर ती हातात कापलेली वेणी फ्लाँट करताना दिसली. ही पोस्ट आणि रणवीरच्या आईचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पोस्टमध्ये तिने असेही म्हटले आहे की, नात दुआ जसजशी मोठी होते, तसतसे आजूबाजूच्या प्रत्येकाला दुआच्या आनंद आणि सौंदर्यातून देवीची शक्ती व दयाळू स्वभाव जाणवत आहे. अंजू भवनानीच्या या कृतीने तिने अनेकांची मन जपली आहेत.
आणखी वाचा – सुनील पाल यांनी स्वत:च रचला स्वतःच्या अपहरणाचा खेळ?, ऑडिओ व्हायरल होताच म्हणाले, “डोक्यावर बंदूक असेल तर…”
नुकतीच म्हणजेच ९ डिसेंबरला दीपिका मुंबई विमानतळावर दिसली होती. यावेळी तिच्याबरोबर मुलगी दुआही होती. आई व मुलगी एकत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ होती. दीपिकाने तिची मुलगी दुआला छातीशी धरले होते. मात्र, यावेळी त्यांनी दुआचा चेहरा लपवून ठेवला. अद्याप रणवीर व दीपिकाने त्यांच्या लेकीचा चेहरा दाखवलेला नाही. त्यामुळे सगळ्यांना या जोडप्याच्या लेकीला पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.