Tharla Tar Mag Serial Update : टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेली मालिका म्हणजे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका. जेव्हापासून ही मालिका सुरु झाली आहे तेव्हापासून या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या मालिकेचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. मालिकेतील कथानकाबरोबरच मालिकेतील पात्रांनीही प्रेक्षकांना खुर्चीत खेळवून ठेवण्यास मदत केली आहे. सायली व अर्जुन ही भूमिका साकारणारे जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांचा अभिनय प्रेक्षकांना विशेष भावतोय. सायली व अर्जुन या मालिकेतील जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरले आहे.
मालिकेत नवनवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. सायली अर्जुनबरोबर इतरही कलाकार मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका गाजवताना दिसतात. मालिकेत सायली व अर्जुन यांचं कॉन्टॅक्ट मॅरेजचं गुपित अजून समोर आलेलं नाहीये त्यामुळे घरातल्यांना त्यांचं खरंच लग्न झालं आहे असं वाटत आहे. मात्र सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची ही गोष्ट प्रियाला ठाऊक असते तर एकीकडे प्रियाचं अर्जुनवर एकतर्फी प्रेम असतं. अर्जुनला मिळवण्यासाठी प्रिया वाटेल ते करायला तयार असते. तर इकडे अर्जुन सायलीच्या प्रेमात पडलेला असतो तर सायली अर्जुनच्या मात्र सायली व अर्जुन यांनी एकमेकांवरील प्रेमाची कबुली अद्याप दिलेली पाहायला मिळत नाहीये.
आणखी वाचा – करीना कपूरने आपल्या मुलांना दिली आहे ‘अशी’ शिकवण व संस्कार, पोस्टही केली शेअर, म्हणाली, “जगात सर्वश्रेष्ठ…”
नुकताच ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्रामवर ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या महाएपिसोडचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अर्जुन हातात फुलांचा गुच्छ घेऊन सायली समोर प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रॅक्टिस करताना दिसतोय. याचवेळी प्रिया एका झाडामागे लपून अर्जुनच बोलणं ऐकताना दिसत आहे. अर्जुन म्हणतो की, “मिसेस सायली मला तुम्हाला माझ्या मनातलं पहिल्यांदाच सांगायचं आहे”. तेव्हा प्रिया मनातल्या मनात म्हणते, “मला माहितीये तुझं सायलीवर खरं प्रेम नाहीये.” पण, तितक्यात अर्जुन म्हणतो, “आय लव्ह यू मिसेस सायली”. हे ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीनचं सरकते.
प्रिया मनातल्या मनात म्हणते, “म्हणजे अर्जुनचं सायलीवर खरं प्रेम आहे. अर्जुन तुझं हेच खरं प्रेम मी तुझ्या खोट्या कॉन्ट्रॅक्टसारखं खोटं ठरवेन”. आता खरंच अर्जुन सायलीसमोर प्रेमाची कबुली देणार का हे पाहणं रंजक ठरेल.