disha patani father Filed Complaint : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांची फसवणूक झाली असल्याचं समोर आलं आहे. दिशा पटानीचे वडील जगदीश सिंह पटानी हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. सेवानिवृत्त डेप्युटी एसपी आणि दिशा पाटनीचे वडील जगदीश सिंग पटनी यांना सरकारी कमिशनमध्ये उच्च पद देण्याचे आश्वासन देणाऱ्या पाच जणांनी २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप पोलिसांनी शुक्रवारी केला. शुक्रवारी संध्याकाळी बरेली कोतवाली पोलिस ठाण्यात याबाबत एफआयआर दाखल करण्यात आला. जगदिश सिंह हे उपअधिक्षक पदावरुन निवृत्त झाले होते.
कोतवाली पोलिस स्टेशनचे प्रभारी डीके शर्मा म्हणाले, “शिवेंद्र प्रताप सिंह, दिवाकर गर्ग, जुना आखाड्याचे आचार्य जयप्रकाश, प्रीती गर्ग आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणूक, गुन्हेगारी धमकी आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करुन कठोर कारवाई करण्याचे प्रयत्न सुरु आहेत”. तक्रारीनुसार, बरेलीच्या सिव्हिल लाइन्स भागात राहणारे जगदीश पटनी यांनी आरोप केला आहे की, शिवेंद्र प्रताप सिंह यांनी त्यांची ओळख दिवाकर गर्ग आणि आचार्य जयप्रकाश यांच्याशी करुन दिली. आरोपीने मजबूत राजकीय संबंध असल्याचा दावा केला आणि जगदीश पाटणी यांना सरकारी आयोगात अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा तत्सम प्रतिष्ठित पद मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
जगदीश पाटणीचा विश्वास संपादन केल्यानंतर, त्यांनी त्याच्याकडून २५ लाख रुपये घेतले – ५ लाख रुपये रोख आणि २० लाख रुपये तीन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. तीन महिने काहीही झाले नसताना आरोपींनी व्याजासह पैसे परत करण्याचे आश्वासन दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी सांगितले, जगदीश पाटणीने पैसे परत मागितल्यावर त्यांनी धमक्या देण्यास आणि आक्रमक वर्तन करण्यास सुरुवात केली. पटनी यांनी पुढे आरोप केला की, फसवणूक करणाऱ्यांनी त्यांच्या राजकीय संबंधांच्या खोट्या दाव्याला बळ देण्यासाठी हिमांशू नावाच्या त्यांच्या स्वत:च्या एका सहकाऱ्याची ओळख करुन दिली.
मोठ्या फसवणुकीचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला.