Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, त्या आर्किटेक्चर अनुष्काला भेटण्यासाठी अहिल्यादेवी थेट एक्झिबिशनला पोहोचतात. अनुष्का एक्झिबिशनला येणार असल्याची खबर अहिल्यादेवींना लागलेली असते. एक्झिबिशनमध्ये गेल्यानंतर आर्किटेक्चर अनुष्काची देखील तिथं हटके एन्ट्री होते. त्यानंतर औकशनला सुरुवात होते आणि शंभर वर्ष जुन्या चित्राचा लिलाव सुरु होतो. या वेळेला अहिल्यादेवी व अनुष्का यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळते. मात्र अहिल्यादेवी एका पॉईंटला थांबतात आणि ते चित्र अनुष्का खरेदी करते. १ करोड २५ लाखाला हा व्यवहार होतो. त्यानंतर सगळेचजण अनुष्काचं कौतुक करतात.
तेव्हा अहिल्यादेवी म्हणतात की, व्यवसायात कुठे थांबायचं हे वेळीच कळलं पाहिजे. हा सौदा तुला खूपच महागात पडला. त्यानंतर अनुष्का स्टेजवर जाते आणि अहिल्यादेवींना स्टेजवर बोलावून घेते. तिचा अपमान होईल म्हणून अहिल्यादेवी स्टेजवर जातात. त्यानंतर अनुष्का सांगते की, ‘कुठे थांबायचं हे मला सुद्धा माहित आहे कारण मी तुमचा आदर्श घेऊन व्यवसायात पदार्पण केले आहे. तुम्ही माझ्या रोल मॉडेल आहात. आजपर्यंत मी तुमचा बराच अभ्यास केलेला आहे मात्र हे चित्र मला कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही रकमेला विकत घ्यायचे होते. मग त्यासाठी मला कितीही किंमत मोजावी लागली असती तरी चाललं असतं’. यानंतर अनुष्का सांगते की, ‘हे चित्र मी कॅन्सरग्रस्त काही रुग्णांच्या संस्थेला देणार आहे त्यामुळे हे चित्र मला विकत घेणे महत्त्वाचं वाटलं.
पैशांपेक्षा कधीकधी माणसांचा जीवही महत्त्वाचा असतो’. अनुष्काचे हे सारं बोलणं अहिल्यादेवींना भारावून टाकतं. अहिल्यादेवी खूपच भारावून जातात आणि तिच्यावर इम्प्रेस होतात. त्यानंतर घरी आल्यानंतर सगळेजण अनुष्काबद्दल श्रीकांतला सांगत असतात, तेव्हा अहिल्यादेवी अनुष्काचं भरभरुन कौतुक करतात. यानंतर आदित्य ही अनुष्काचं कौतुक करताना दिसतो. तेव्हा दामिनी मध्येच म्हणते की, ‘तुला अनुष्का आवडली का?, आपण पुढची बोलणी करायची का?’. यावर सगळेचजण आदित्यला चिडवू लागतात. अहिल्यादेवीही आदित्यला चिडवू लागतात. तितक्यात पारू तिथे येते तेव्हा श्रीकांत पारुलाही अनुष्काबद्दल सांगतो. हे ऐकून पारू खूपच नाराज होते.
आणखी वाचा – करीना कपूरने आपल्या मुलांना दिली आहे ‘अशी’ शिकवण व संस्कार, पोस्टही केली शेअर, म्हणाली, “जगात सर्वश्रेष्ठ…”
मालिकेच्या पुढील भागात आता सावित्री पारूला सांगते की, ‘आदित्य बाबांना त्या कार्यक्रमाला एक मुलगी आवडली आहे आणि आता त्यांचं लग्न देखील होईल मग तू या मंगळसूत्राचं काय करणार आहेस?, काढून टाकणार आहेस का?’, असं विचारताच पारूच्या डोळ्यात पाणी येतं. पारू ही लढाई कशी लढेल, हे सारं पाहणं मालिकेत रंजक ठरेल.