बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही नेहमी चर्चेत असलेली पाहायला मिळते. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिला तैमुर व जेह अशी दोन मुलं आहेत. अनेकदा त्यांना एकत्रित स्पॉट केले जाते. कलाकार मंडळींसह या कलाकारांच्या मुलांचीही विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळत असते. कलाकारांच्या चाहत्यांना त्यांच्या मुलांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच लागून राहिलेली असते. तैमूर अली खान व जेह ही करीनाची दोन्ही मुलं पापाराझींमध्ये खूप लोकप्रिय आहेत. करीना सोशल मीडियावरदेखील अधिक सक्रिय असलेले बघायला मिळते. (kareena kapoor instagram post)
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या करीनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिले आहे की, “मला असं वाटतय की मी माझ्या मुलांना सगळं काही शिकवलं आहे की जगात प्रेम हे सर्वश्रेष्ठ आहे”. तसेच त्यानंतर ‘गुडमॉर्निंग’ असेही लिहिले आहे. करीना व सैफ यांनी २०१२ साली लग्नबंधनात अडकले. २०१६ साली तैमुरचा जन्म झाला आणि २०२१ साली जेहचा जन्म झाला.
दरम्यान तैमुर व जेह हे दोघंही सोशल मीडियावर अधिक चर्चेत असतात. कॅमेरासमोर जेहच्या अनेक हरकतीदेखील कॅप्चर केले जातात. जेहची अनेकदा पापाराझीवर दादागिरीदेखील असलेली बघायला मिळते. त्याचप्रमाणे जेहच्या अनेक व्हिडीओना चाहत्यांची पसंतीदेखील मिळत असते. दरम्यान तैमूर हा सार्वजनिक ठिकाणी शांत असल्याचे पाहायला मिळाले आहे तर जेह हा अनेकदा मजा करताना दिसतो.
तसेच रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अजय देवगण, रणवीर सिंग, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर यांच्याही भूमिका होत्या. सलमान खानचाही एक कॅमिओ आहे. सैफबद्दल सांगायचे तर, ‘देवरा: पार्ट १’ नंतर तो ‘ज्वेल थीफ: द रेड सन चॅप्टर’मध्ये दिसणार आहे. यामध्ये तो राजा चौहानच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.