Tharla Tar Mag Serial Promo : ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेली आहे. ही मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेतील पात्रांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. इतकंच नव्हे तर सायली व अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. सायली व अर्जुन कायमचे केव्हा एकत्र येणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. सायली व अर्जुन यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असल्याचं सत्य अद्याप त्यांनी कुटुंबापासून लपवून ठेवलं आहे.
मालिकेत सध्या असं पाहायला मिळत आहे की, अर्जुनला सायलीबद्दल वाटणार प्रेम त्याला सांगायचं आहे. तर सायलीलाही तिच्या मनातील भावना अर्जुनसमोर मांडायच्या आहेत. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहेत मात्र दोघांनीही एकमेकांसमोर प्रेमाची कबुली दिलेली नाही. अर्जुन लव लेटर लिहून सायलीला देण्याचा त्याचा प्रयत्न असतो आणि चैतन्य त्याला यात मदत करत असतो. चैतन्यच्या सांगण्यानुसार अर्जुन लव लेटर लिहितो आणि ते लव लेटर तो डायनिंग टेबलवर ठेवतो, जेणेकरुन ते सायलीच्या नजरेस पडेल. मात्र प्रिया डाव बदलते आणि त्या लव्ह लेटरच्या जागी वाण सामानाची यादी ठेवते.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : अहिल्यादेवींनी आदित्यसाठी अनुष्काला घातली मागणी, होकार देणार का?, पारूचं काय होणार?
त्यामुळे सायली ती चिट्ठी फाडून टाकते. सायली चिट्ठी फाडताना अर्जुन पाहतो आणि दुखावतो. यानंतर आता मालिकेच्या समोर आलेल्या एका नव्या प्रोमोने साऱ्यांची उत्सुकता वाढविली आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये सायली व अर्जुनची रोमँटिक डेट पाहायला मिळतेय. एका रेस्टॉरंटच्या रोमँटिक माहोलमध्ये अर्जुन सायलीला प्रपोज करणार असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये अर्जुनची एन्ट्री होते. सायली रेस्टॉरंटच्या टेबलवर अर्जुनची वाट पाहत बसलेली असते.
आणखी वाचा – उर्मिला कोठारेची लेकीसह इंटरनॅशनल ट्रीप, ‘त्या’ फोटोने वेधलं लक्ष, म्हणाली, “माझी राजकुमारी…”
सायलीसमोर गुलाब आणि चाफ्याची फुले असतात. दोघेही एकमेकांसमोर येताच पाहत राहतात. आणि अर्जुन सायलीला म्हणतो, “मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे”. यादरम्यान, अर्जुन त्याच्या खिशातून अंगठी सुद्धा आणतो. तो म्हणतो, “आय…” आणि इथेच प्रोमो संपतो. आता मालिकेत दोघंही एकमेकांवरच प्रेम व्यक्त करणार का?, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.