Aditi Rao Hydari : अदिती राव हैदरीने तिच्या लग्नाचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करुन खळबळ उडवून दिली आहे. लग्नाच्या जवळपास तीन महिन्यांनंतर अदिती रावने पुन्हा एकदा ग्रँड वेडिंग केले असल्याचे समोर आले आहे. तिने तिच्या स्वप्नाळू लग्नातील अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यानंतर लोकांच्या नजरा त्या फोटोंकडे खिळल्या आहेत. यावेळी अभिनेत्री लाल रंगाच्या लेहेंग्यात दिसतेय. अदितीने पती सिद्धार्थबरोबर जबरदस्त पोज देत फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंवरुन दोघांमधील प्रेम आणि रोमान्स पाहण्यासारखा आहे. यामुळेच अदितीच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. पाहूया.
दुस-या लग्नाचे फोटो शेअर करताना अदिती राव हैदरीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एकमेकांची साथ”. फोटोंबद्दल सांगायचे तर, तिने लाल फुलांच्या स्लीव्ह ब्लाउजसह मॅचिंग लेहेंगा घातलेला दिसला ज्यामध्ये बॉर्डरवर भरजरी काम केलं आहे आणि एक मॅचिंग लाल दुपट्टा घेतला आहे. याबरोबर तिने महाराणी नेकलेस तसेच मोठे कानातले घालून हा लूक पूर्ण केला आहे. न्यूड मेकअप आणि नाकाची रिंग तसेच कपाळावर साधी बिंदी घालून तिने तिच्या लग्नाच्या लूकमध्ये भर घातली आहे. एका छायाचित्रात अदिती आणि सिद्धार्थ हार घालताना दिसत आहेत, विशेष म्हणजे सिद्धार्थ पांढरा कुर्ता, पायजमा आणि दुपट्टा घेऊन स्टाइल मारताना दिसत आहे.
अदिती राव हैदरीबद्दल बोलले जात आहे की, लग्नाच्या सुमारे तीन महिन्यांनंतर तिने उदयपूरमध्ये पुन्हा लग्न केले आहे. यादरम्यान ती सब्यसाचीचा लेहेंगा स्टाइल करताना दिसली. पूर्वी दक्षिण भारतीय शैलीत मंदिरात लग्न करणारी ही अभिनेत्री आता उदयपूरमधील अलीला फोर्ट बिशनगड येथे तिच्या स्वप्नातील लग्नाची झलक शेअर करताना दिसली. एकामागून एक स्वप्नवत फोटो शेअर करुन अदिती राव हैदरी हिने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : अहिल्यादेवींनी आदित्यसाठी अनुष्काला घातली मागणी, होकार देणार का?, पारूचं काय होणार?
दुसऱ्या लग्नाची छायाचित्रे चाहत्यांसाठी खरोखरच एखाद्या भेटवस्तूपेक्षा कमी नाहीत. या फोटोंचे सौंदर्य पाहण्यासारखे असून चाहत्यांसह सेलिब्रिटीही यावर कमेंट करत आहेत. आदिती राव हैदरीबद्दल सांगायचे तर, १६ सप्टेंबर रोजी तिने सिद्धार्थबरोबरच्या लग्नाचे फोटो शेअर केले होते.