Paaru Marathi Serial Promo : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन पाठिंबा मिळताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. पारू व आदित्यच्या जोडीवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसतायत. मालिकेत सध्या अनुष्काच्या एन्ट्रीने खूप मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. मालिकेत अनुष्काच्या एन्ट्रीने नवं वादळ आलं आहे. मात्र याची भनकही तिने कोणालाच लागू दिलेली नाही. पारू मालिकेत अहिल्यादेवी किर्लोस्कर अनुष्काची परीक्षा घ्यायचं ठरवतात. अहिल्यादेवी अनुष्का जे बोलतेय ते खरंच करते का हे तपासण्यासाठी तिची परीक्षा घेतात. अहिल्यादेवी पारूबाबत केलेलं विधान अनुष्काला मागे घेण्यास सांगतात.
मात्र अनुष्का ते विधान मागे घेण्यास नकार देते. यावर अहिल्यादेवींचा राग अनावर होतो. त्या अनुष्काला माफी मागण्यास सांगतात, त्यावर अनुष्का नकार देते. आणि तिचं विधान योग्य असल्याचं पटवून देते. यावर अहिल्यादेवी अनुष्काला बरबाद करायचा सल्ला देतात, तरीही अनुष्का मागे हटत नाही. अनुष्काचा हा स्वभाव अहिल्यादेवींच्या पसंतीस पडतो. त्या अनुष्काचं कौतुक करतात, आणि तिची परीक्षा घेत असल्याचं सांगतात. एकीकडे स्वतःला चांगलं दाखवून अनुष्का अहिल्यादेवींच्या आणि किर्लोस्कर घरातील प्रत्येकाच्या मनात घर करते.
आणखी वाचा – “तू म्हातारी झालीस हे स्वीकार”, नेटकऱ्याने डिवचताच ऐश्वर्या नारकर भडकल्या, उत्तर देत म्हणाल्या, “वेळ येते…”
अशातच मालिकेच्या एका नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या प्रोमोमध्ये थेट अहिल्यादेवी आदित्यच्या वाढदिवसानिमित्त त्याला स्पेशल गिफ्ट देण्याचं ठरवतात. प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, अहिल्यादेवी अनुष्काला असं म्हणताना दिसत आहेत की, “उद्या आदित्यचा वाढदिवस आहे. त्याला एक स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे. तू त्याच्या आयुष्यात येणं यापेक्षा अजून स्पेशल काहीच असू शकत नाही. तुझा जर होकार असेल तर तू उद्या येशील”.
आणखी वाचा – आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करत आहे दिलजीत दोसांझ, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “मला रोज किती टेन्शन येतं…”
त्यानंतर घरातील सगळेजण आदित्यला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. तेव्हा आदित्यला अहिल्यादेवी म्हणतात, “उद्या तुझ्यासाठी माझ्याकडून एक खास सरप्राईज आहे”. आता अनुष्का आदित्यच्या वाढदिवसाला येणार का?, अनुष्का आदित्यला होकार देणार का?, पारूचं पुढे काय होणार हे सारं पाहणं मालिकेत रंजक ठरेल.