आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारी लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कोठारेने आपल्या भूमिकांतून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. उर्मिलाने तिच्या भूमिका अतिशय उत्कृष्ट पद्धतीने साकारल्या आहेत. त्यातही ‘दुनियादारी’ मधील तिच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. उर्मिला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. उर्मिला अनेकदा तिचे नृत्य करतानाचे व्हिडीओही आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तिच्या या फोटो व व्हिडीओला चाहतेही भरभरून प्रतिसाद देत असतात. अशातच तिने नुकताच आपल्या लेकीबरोबर शेअर केलेला फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Urmila Kothare Daughter International Trip)
उर्मिलाने मुलगी जिजाबरोबरचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोसह तिने आपल्या लेकीबरोबर इंटरनॅशनल ट्रीपला जात असल्याचे सांगितलं आहे. उर्मिलाने जिजाबरोबरचा विमानतळावरील एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीककडे खूप बॅग्स पाहायला मिळत असून या बॅग्सवर जिजा बसलेली पाहायला मिळत आहे. तीन मोठ्या ट्रॉली बॅग्सवर जिजा बसलेली दिसत आहे. लेकीबरोबरचा हा फोटो शेअर करत उर्मिलाने असं म्हटलं आहे की, “माझ्या राजकुमारीबरोबर एका मजेदार आंतरराष्ट्रीय प्रवासाकडे जात आहे”.
तसंच “पुढील अपडेट्ससाठी बरोबर राहा” असंही म्हटलं आहे. उर्मिलाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला आहे आणि या गाण्याला तिने दुबईचे गाणे लावले आहे. त्यामुळे अभिनेत्री दुबईला जात आहे की काय असा प्रश्न पडला आहे. उर्मिलाने आदिनाथ कोठारेशी २० डिसेंबर २०११ मध्ये प्रेमविवाह केला आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून आदिनाथ व उर्मिला यांच्यात काही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. पण दोघेही जिजाबरोबरचे फोटो शेअर करत असतात.
दरम्यान, मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकणारी लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कानेटकर हिने कायमच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिचा ‘शुभमंगल सावधान’ हा चित्रपट गाजला होता. तर ‘काकण’ या चित्रपटाने तिला अभिनेत्री म्हणून विशेष ओळख मिळवून दिली. नुकतीच ती ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेमध्ये पाहायला मिळाली होती.