Tharla Tar Mag Serial : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका जेव्हापासून सुरु झाली तेव्हापासून प्रेक्षकांच्या पसंतीस आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळतेय. मालिकेच्या कथानकाने ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळतेय. तर सायली-अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. इतकेच नाही तर मालिकेतील इतरही कलाकार त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. मालिकेत सध्या नवनवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. मालिकेत सध्या सायली व अर्जुन यांमध्ये दुरावा आला असल्याचं दिसतंय. दोघांमधील हा दुरावा इतका वाढला आहे की ते एकमेकांपासून लांब राहत आहेत.
सायली-अर्जुन यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य सर्वांसमोर आल्याने सुभेदार कुटुंबाचे दरवाजे सायलीसाठी कायमचे बंद होतात, तर मधू भाऊही सायलीला घेऊन कुसुमकडे राहायला जातात. तर एकीकडे मधू भाऊंना पटवून अर्जुन सायलीला भेटायचे ठरवतो मात्र तो यांत असफल होतो. मालिकेत अजूनही सायली व अर्जुन यांनी त्यांच्या एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिलेली नाही. त्यामुळे दोघेही एकमेकांसमोर केव्हा प्रेमाची कबुली देणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहील आहे.
आणखी वाचा – खरा चेहरा समोर येऊनही अहिल्यादेवींनी घेतली अनुष्काची बाजू, असे करण्यामागचं नेमकं काय असेल कारण?
आता प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. कारण नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सायलीने अर्जुनसमोर प्रेमाची कबुली दिलेली पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, अर्जुन सायलीच्या चाळीबाहेर येऊन गुंडाना मारत असतो. त्यावेळी सायली अर्जुनच्या मदतीला जायला निघते तेव्हा मधू भाऊ तिला अडवतात. तेव्हा सायली मधुभाऊंना हात सोडायची विनंती करते. सायली मधुभाऊंना म्हणते की, “मधुभाऊ मला जाऊद्या. कोर्टामध्ये तुमच्यासाठी आणि कोर्टाबाहेर माझ्यासाठी हा माणूस फक्त लढत आला आहे. आज त्यांना माझी गरज आहे”.असं म्हणत ती अर्जुनकडे धाव घेते.
तोवर ते गुंड अर्जुन बेदम मारतात आणि तो खाली कोसळतो. अर्जुन खाली पडताच सायली त्याच्याजवळ येते आणि त्याला म्हणते, “अर्जुन सर माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे”. त्यावर अर्जुन सायलीला जवळ घेतो, आता अखेर सायलीने अर्जुनवरील प्रेमाची कबुली दिली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार?, हे दोघे एकत्र कसे व कधी येणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.