Paaru Serial Update : ‘पारू’ मालिकेत एका मागोमाग एक रंजक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अनुष्का व आदित्य अगदी सुरळीतपणे लग्नानंतरचे विधी पार पाडत फोटोशूट पूर्ण करतात. यावर अहिल्यादेवी हे फोटोशूट निर्विघ्नपणे पार पडल्यामुळे खूप खुश असतात आणि ‘मी असताना इथं काही चुकीचं घडू शकत नाही त्यामुळे हे निर्विघ्नपणे पार पडलं’, असल्याचं सांगतात. मात्र आदित्य खूप नाराज असतो. त्याच वेळेला अनुष्का सगळ्यांसमोर सांगते की, आदित्य शूटदरम्यान तू सारखं पारू-पारू करत होतास. माझ्या जागी तू पारूलाच पाहत होतास का?, असा सवाल करते.
अनुष्काच हे बोलणं ऐकल्यावर सगळ्यांनाच धक्का बसतो. तर आदित्य म्हणतो, “मी असं केव्हा बोललो?”. यावर अनुष्का सांगते की, “तुला आठवत नाहीये का तू सतत पारू पारू करत होता”. यावर आदित्य सांगतो की, ‘पारू सतत माझ्या डोळ्यासमोर असते किंवा मी पारुला आवाज देतो म्हणून कदाचित असं घडलं असावं’. तर अनुष्का त्याला समजून घेते. हे अहिल्यादेवींना खूप मोठा प्रश्न पडतो. त्यानंतर आदित्य रागावून स्वतःच्या रूममध्ये निघून जातो. प्रिया आदित्यला समजावायला म्हणून त्याच्या रूम मध्ये येते तेव्हा तो प्रियालाही आई चुकत असल्याचे सांगतो.
आणखी वाचा – सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा करीना कपूर खान बहिणींबरोबर करत होती पार्टी, फोटोमध्ये दिसलं सत्य
तर इकडे अनुष्का तिच्या रूममध्ये येते आणि निवांत बसते. त्याचवेळी तिथे पारू येते. पारू अनुष्काला विचारते, ‘शूट सुरू होण्याआधी तुम्ही लगबगीने कुठे गेला होता आणि तुम्ही कोणाला पैसे दिले?’. हे ऐकल्यावर अनुष्काच्या चेहऱ्यावर रंगच उडतो. अनुष्का सांगते, ‘मी एका गरजूला गरज होती म्हणून मी त्यांना पैशांची मदत करायला गेले’. तेव्हा पारू सांगते, ‘माझी छेड काढणाऱ्या गुंडांना सोडवायला तुम्ही पैसे दिले हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि हे आता मी अहिल्यादेवींना सांगणार’, असं सांगून ती निघून जाते.
अहिल्यादेवींसमोर पारू अनुष्काचा खरा चेहरा आणते. देवीआईंना आणि आदित्यला पारू सर्व सत्य सांगते. यावर आदित्य अनुष्कावर भडकतो. त्यानंतर अनुष्का असं केल्याचं कबूल करते. आणि अहिल्यादेवींची माफी मागते. यावर अहिल्यादेवी अनुष्काची बाजू घेत, असं काही बोलतात ज्याने सगळ्यांना धक्का बसतो. अनुष्काने त्या गुंडांना पैसे माझ्या सांगण्यावरुन दिले, असं अहिल्यादेवी सांगतात. हे ऐकून सगळेच चकित होतात. आता अहिल्यादेवींनी असं नेमकं का केलं असेल हे पुढील भागात कळेल.