सध्या अभिनेता सैफ अली खानवर हल्ल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. रात्रीच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने घरात घुसून सैफवर चाकूने हल्ला केला आणि तो पळून गेला. या सगळ्यामध्ये सैफ गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल केले गेले. त्याच्यावर तिथे त्याच्यावर तब्बल अडीच तास शस्त्रक्रिया करण्यात आली. आता तो संकटातून बाहेर असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. त्याबद्दलच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत. दरम्यान हल्ल्यादरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. यामध्ये आरोपींनाही बघण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी आता याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. (Bollywood Actor Saif Ali Khan Attacked At Home)
पोलिसांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर चोरी करण्याच्या कारणाने वांद्रे येथील घरात घुसले होते. यावेळी एका आरोपीची ओळख पटली आहे. आता पोलिस इतरांची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मते हल्लेखोर फायर एस्केपच्या म्हणजेच शिड्यांचा वापर करुन १२ मजले चढून घरात घुसला. तसेच आतमध्ये ज्या शिड्यांच्या रस्त्याने घरी घुसला होता त्याच रस्त्याने तो पळून गेला. एका आरोपीला फुटेजमध्ये बघण्यात आले आहे.
सध्या सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर चाकूने हल्ला केला आहे. त्याच्यावर सहा वार करण्यात आले. मानेवर व मणक्याला मोठा मार लागला आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सैफच्या मणक्यातून अडीच इंचाचा तुकडा काढण्यात आला आहे. न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन डॉ. लीना जैन, भूलतज्ज्ञ डॉ. निशा गांधी आणि डॉ. उत्तमनी यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर शस्त्रक्रिया करत आहे. आता तो डॉक्टरांच्या देखरेखीलखाली असून शुक्रवारी १७ डिसेंबर २०२५ घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान सैफ लवकर बरा व्हावा यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत. सैफवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा करीना बहीण करिश्मा कपूर, सोनम कपूर व रिया कपूर यांच्याबरीवर नाइट आऊट पार्टी करत होती. याबाबतची स्टोरी तिने सोशल मीडियावर शेअर केली होती.