प्रसिद्धी मिळाली की, टीका करणारे ट्रोल करणारेही येतातच. आता सोशल मीडियामुळे स्टार झालेल्या अनेकांना सोशल मीडियावरच ट्रोल करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यात अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागाला आहे. अशातच त्यांनी किंक्रातीनिमित्त एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामुळे त्यांना पुन्हा एकदा ट्रोल केलं आहे. धनंजय पोवार यांनी किंक्रातीनिमित्त मटण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्याला नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला. मात्र या व्हिडीओवर एकाने नकरात्मक कमेंट केली आहे. ज्यावर धनंजय पोवार यांनी भाष्य केलं आहे. डीपी दादांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करत त्यांना केलेल्या ट्रोलिंगबद्दल भाष्य केलं आहे. (dhananjay powar on troller)
या व्हिडीओमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “एक चांगली व्यक्ती आहे. म्हणजे मी सहज व्हिडीओच्या कमेंट्स बघत होतो. तर आपण जो किक्रांतीनिमित्त मटणाचा व्हिडीओ शेअर केला होता. तर त्यावर एकाने कमेंट केली आहे. सुरेंद्र प्रभू म्हणून एक आहेत त्यांनी आपल्या व्हिडीओवर कमेंट केली आहे की, “खरंच *** माणूस आहे. संक्रांतीला मटण खातो”. त्यांनी ज्या व्हिडीओवर कमेंट केली आहे त्या व्हिडीओचं टायटल आहे की ‘किंक्रातीचे मटण’. म्हणजे काय बोलावं आणि काय नाही हे पण कळत नाही. ही व्यक्ती नक्की कोण आहे ते बघूया आपण. सुरेंद्र प्रभू असं त्यांचं नाव आहे. पी.एन.गाडगीळ अँड सन्समध्ये ते जॉबला असून सध्या ते पुण्यात राहतात अशी त्यांची माहिती आहे”.
आणखी वाचा – हल्ला होताच रक्तबंबाळ झाला होता सैफ अली खान, लेक इब्राहिमने घाबरत रुग्णालयामध्ये नेलं अन्…
यापुढे धनंजय यांनी असं म्हटलं आहे की, “त्यांचा फोटोही मी शेअर केला आहे. म्हणजे त्यालाही कळूदे की, लोकांच्या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये जाऊन बोलल्यावर काय होतं. तर मला इतकंच सांगायचं आहे की, मित्रा कमेंट करत असताना पहिलं आपण टायटल वाचावं. मटण संक्रांतीचं होतं की किंक्रातीचं होतं. अक्कलेचा भाग पाहिजे. गाडगीळ अँड सन्सवाल्यांना आता विचार करायला लागेल याला अक्कल आहे की नाही. गाडगीळ अँड सन्सवाल्यांना आता विचार करायला लागेल की, याला अक्कल आहे की नाही. आणि तुम्ही खरंच गाडगीळ अँड सन्सवाले याचा विचार करा”.
यापुढे धनंजय यांनी असं म्हटलं आहे की, “किंक्रातीच्या व्हिडीओला त्याने संक्रातीची कमेंट केली आहे. उलट मला कमेंट केली आहे. अशामुळे पी.एन.गाडगीळ अँड सन्स तुमचं नाव इथे आलं आहे”. दरम्यान, काही दिवसांपूर्वी धनंजय यांनी त्यांना फर्निचर दुकानावरुन ट्रोल करण्याबद्दल भाष्य केलं होतं. यावर शांत न बसता धनंजय यांनी त्या युझरच्या कमेंटचे स्क्रिन शॉर्ट्स शेअर करत त्याला उत्तर दिलं होतं.