Tharla Tar Mag New Promo : ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळत आहे. या मालिकेच्या कथानकानं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सायली-अर्जुन ही जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. मात्र आता मालिकेत आलेल्या एका मोठ्या ट्विस्टने खूप मोठं रंजक वळण येणार असल्याचे पाहायला मिळतेय. मालिकेत सायली व अर्जुन यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असल्याचे पाहायला मिळतेय. मात्र त्यांनी या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल अद्याप घरातल्या कोणत्याही सदस्याला काहीही सांगितलेलं नाहीये. आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज दरम्यानच ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पडली असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र त्यांनी प्रेमाची कबूलही दिलेली नाहीये.
अशातच काही दिवसांपूर्वी मालिकेचा एक प्रोमो समोर आला यामध्ये सायली व अर्जुन यांची रोमांटिक डेट पाहायला मिळाली होती. या प्रोमोमध्ये सायली व अर्जुन एका रेस्टॉरंटमध्ये एकमेकांना भेटलेले पाहायला मिळतात आणि रेस्टॉरंटमध्येच अर्जुन-सायलीवरील प्रेमाची कबुली देताना दिसतात. यानंतर आता समोर आलेल्या एका प्रोमोने साऱ्यांचा धक्का बसला आहे. सायली व अर्जुन घरी येतात तेव्हा घरातले सगळे सदस्य त्यांची वाट पाहत असतात. दोघेही घरी येताच कल्पना त्यांना दारातच थांबवते आणि विचारते की, “खूप प्रेम आहे ना तुमचं एकमेकांवर”. यावर अर्जुन हो असं म्हणतो.
त्यावर कल्पना म्हणते, “खोटं. हे ही तुमच्या लग्नासारखंच खोटं”. तेव्हा सायली कल्पनाला आई अहो असं म्हणायला जाते. तेव्हा कल्पना सायलीला थांबवते आणि म्हणते, “बाहेरच्या माणसाने यांत पडू नये. अरे हिचं सोड ही तर माझी कधीच नव्हती, पण तू…”, असं अर्जुनला म्हणते. यावर अर्जुन “काय म्हणतेयस ते कळत नाही”, असं म्हणतो. यावर कल्पना पुढे ती म्हणते, “हे तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स”, असे म्हणत डिवोर्सचे पेपर फेकते.
आता हा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्याही मनाची धास्ती वाढवली आहे. सायली व अर्जुन घरातल्यांच्या नजरेतून उतरलेले पाहायला मिळतात. दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य लपवून ठेवले मात्र तन्वीने ते सत्य सगळ्यांसमोर आणलेलं असतं. आता सायली व अर्जुन त्यांचे एकमेकांवर असलेले प्रेम घरातल्यांना कसं पटवून देणार हे सारं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.