Tharla Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, अर्जुन न खाता-पिता गेल्याने सायलीचा राग अनावर झालेला असतो. सायली रागारागात सगळी काम करत असते तेव्हा पूर्णा आजी मधुभाऊंना म्हणतात, ‘नवरा न खाता पिता गेला आहे म्हणून बायको सुद्धा अजून जेवली नाहीये’. दोघांचाही भुकेने जीव व्याकुळ झालाय. तितक्यातच अर्जुन आणि चैतन्य तिथे येतात तेव्हा पूर्णा आजी त्याला विचारते, ‘अर्जुन तू काही खाल्लंस का?’. तेव्हा चैतन्य सांगतो की, ‘मी सँडविच घेतलं होतं पण अर्जुनने खायला नकार दिला’. तेव्हा पूर्णा आजी सांगते की, ‘तिकडे नवऱ्याने सुद्धा काही खाल्लं नाहीये म्हणून बायको सुद्धा उपाशीच आहे’. हे ऐकल्यावर अर्जुनला खूप बरं वाटतं की, मिसेस सायली माझ्यासाठी उपाशी आहेत, असं तो मनातल्या म्हणत खुश होतो.
तर पूर्णा आजी सांगते की, तुम्ही दोघांनी खाल्लं नाहीये पण मी मात्र भरपूर पालक थालीपीठ खाल्लं आहे आणि आता माझ्या अंगावर आलं आहे असं म्हणून त्या तिथून निघून जातात. त्यानंतर सायली रागारागात काम करत असते. तेव्हा अर्जुन तिच्याजवळ येतो. तेव्हा पूर्णा आजी पालकचं थालीपीठ म्हणताच अर्जुनच्या लक्षात येतं की, हिरव्या रंगाचं मिसेस सायलीने माझ्यासाठी पालकचं थालीपीठ केलं आहे. त्यानंतर अर्जुन सायलीच्या जवळ जातो तेव्हा सायली रागारागात काम करत असते. तो तिचा हात धरतो आणि तिला डायनिंग टेबलवर घेऊन येऊन बसवतो आणि तिच्या ताटामध्ये पालक थालीपीठ वाढतो.
आणखी वाचा – बेपत्ता कॉमेडियन सुनील पाल सापडताच पत्नीचं भाष्य, पत्रकार परिषद घेत करणार मोठा खुलासा, नेमकं प्रकरण काय?
दोघंही एकमेकांबरोबर बसून खाऊ लागतात आणि एकमेकांना घास भरवतात. त्यानंतर अर्जुनच्या लक्षात येतं की, मिसेस सायली या माझ्यासाठी उपाशी होत्या आणि त्यांनी माझ्यासाठी हे हिरव्या रंगाचे पालक थालीपीठ बनवलं होतं. तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की, मिसेस सायलीच्या मनात माझ्याविषयी प्रेम आहे असं वाटून तो खूप खुश होतो. तर दुसरीकडे प्रतिमा वर्णन करण्यात कमी पडते त्यामुळे नागराज व प्रियाच्या जीवात जीव येतो. नागराज व प्रियाला प्रतिमानेच वाचवलेलं असतं. मात्र, ज्या दिवशी प्रतिमाला आठवेल त्या दिवशी त्यांचं काही खरं नाही असं म्हणून ते प्रतिमाचा काटा काढायचा ठरवतात आणि प्रतिमाला जीवे मारण्याचं ठरवतात. प्रियासुद्धा प्रतिमाला आज तिच्याच खोलीत झोपायला सांगते आणि बेडवर झोपायला सांगते.
आणखी वाचा – “स्वतःची चिरफाड होऊनसुद्धा…”, ‘शिवा’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री झाली मावशी, भावुक व्हिडीओ व्हायरल
तर इकडे सायली रात्री झोपायची तयारी करत असते तेव्हा ती गाणं गुणगुणत असते. त्या गाण्याचा अर्थ अर्जुनला कळतो आणि तो मनात म्हणतो आज मला या गाण्याचा अर्थ कळाला आहे आणि त्या दिवशी सुद्धा मिसेस सायली मला गाण्यामधून त्यांचं प्रेम व्यक्त करत होत्या पण मलाच कळत नव्हतं. हे मला आज कळतंय आता सायली व अर्जुन यांच्यातील प्रेम बहरणार का हे पाहणं मालिकेचे येणाऱ्या भागात रंजक ठरेल.