“रंग माझा वेगळा” ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. ही मालिका गेली तीन वर्षे स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरु आहे. या मालिकेचा दिवसेंदिवस प्लॉट बदलत गेला. मालिकेची सुरुवात दीपा आणि कार्तिकच्या प्रेमाच्या विरोधापासून झाली. आणि आता मालिकेत कार्तिक चौदा वर्षांनी जेल मधून परत आल्याचं दाखवलं आहे. आणि तो पर्यंत दीपा आणि कार्तिकच्या मुली देखील मोठ्या झाल्याचं दाखवलं आहे. आता मालिकेत एक रंजक वळण आल्याचं पहिला मिळतंय. या बद्दलचा व्हिडीओ स्टार प्रवाह या वाहिनीने त्यांच्या ऑफिशल इन्स्टा पेजवर शेअर केलाय. त्यामुळे या मालिकेला आता ट्रोल केलं जात आहे.(Rang maza vegla troll)
या प्रमोमध्ये दाखवल्याप्रमाणे आयशा आता मालिकेत परत आली आहे. आणि आयशा ही आर्यन ची मावशी असल्याचं देखील यात दाखवण्यात आलं आहे. आयेशा च्या परत येण्याचे काय परिणाम होतील दीपा कार्तिक च्या नात्यावर? असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिले आहे. हा नवीन प्रमो पाहून आता प्रेक्षक चिढले आहेत. या प्रोमोच्या पोस्टवर “Ky bakwas ahee” तसेच “मन्द बुद्धि वर्ग कार्यक्रम” अश्या कमेंट्स आल्या आहेत.
हे देखील वाचा –“आम्ही दोघी जोडीच्या जोडीच्या”,निवेदिता सराफ यांच्या बहिणीला तुम्ही पाहिलंत का?
मालिकेच्या येणाऱ्या भागात आयशा कार्तिकला आवाज देत असताना आर्यन तिला मावशी अशी हाक मारतो आणि तिला थांबवतो. तेव्हा आपल्याला समजत आयशा आर्यांची मावशी असते. तर एकीकडे दीपाच्या अश्या वागण्यामुळे दीपिका सौंदर्याला म्हणते आईला मेडिकल हेल्प ची गरज आहे. तू तिला कौन्सिलर कडे घेऊन जा असं सौंदर्याला दीपा सांगते. तर दुसरीकडे आपण बघतो आयशा घरी येऊन अदृश्य असलेल्या कार्तिकशी भांडत असते. दीपिका दीपाला समजावते कि आपण काउन्सिलर कडे जाऊयात. सौंदर्या निर्णय घेते कि आता दीपा कंपनीची डायरेक्टर राहणार नाही आणि आदी इथून पुढे आदी कंपनीची जबाबदारी सांभाळेल हे सगळं बोलणं सुरु असताना दीपा ऐकत असते. याच बरोबर कार्तिक दीपाला कोणत्याही पेयातून रोज गोळ्या देताना दिसतोय.(Rang maza vegla troll)
आता मालिकेत आयशाच्या एन्ट्रीने मालिकेच्या कथानकांमध्ये अजून काय बदल घडणार हे पाहणं मनोरंजनात्मक असेल.