Bigg Boss Marathi season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सध्या सुरु असून चर्चेत आलेला आहे. ‘बिग बॉस’ म्हटलं की ड्रामा, मनोरंजन, भावना, नवनवीन ट्विस्ट या सर्व गोष्टी आल्याच. ‘बिग बॉस मराठी’च्या कालच्या भागात पहिल्यांदाच घरात दोन चिमुकल्या पाहुण्यांची एन्ट्री झाली. या चिमुकल्या पाहुण्यांनी सदस्यांना निरागस सुखासह टास्कचं दु:ख देखील दिलं. घरातील काही सदस्य बाळाची सर्वोत्तम काळजी घेताना दिसून आले. पण आजच्या भागात भावनांच्या या खेळात सदस्य भावशून्य झालेले दिसून येणार आहेत.
भावशून्य झालेल्या या स्पर्धकांची आता ‘बिग बॉस’चांगलीच शाळा घेताना दिसणार आहेत. चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन होताच ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य त्यांच्याबरोबर जोडले गेले. सदस्य या पाहुण्यांसह वेळ घालवतानाही दिसून आले. तर काहींनी या पाहुण्यांवरुन भांडणदेखील केलेलं पाहायला मिळालं. पण पाहुण्यांनी मात्र घरातल्या सदस्यांसह चांगला वेळ घालवला.
आणखी वाचा – Video : एकाच ताटात जेवले निक्की व डीपी, तेच पाहून बायकोचा संताप, म्हणाली, “मी तर तुम्हाला भरवते पण…”
समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, दोन गटांमध्ये एक एक बाळ देण्यात आलं असून प्रत्येक गट आपल्या बाळाची रीतसर काळजी घेताना दिसत आहे. या दोन्ही गटात बाळावरुनही भांडण झाली. ही भांडण इतकी टोकाची झाली की दोन्ही गटांनी बाळांचे कपडे फाडले. त्या दोन नवीन आलेल्या पाहुण्यांचे झालेले हाल पाहून आता ‘बिग बॉस’ दोन्ही गटांना शिक्षा सुनावणार आहेत.
आणखी वाचा – “मी यांना नडणार, ट्रॉफीही माझीच”, सूरज चव्हाणचा Bigg Boss Marathi मधील गेम ऑन , म्हणाला, “खूप बेक्कार…”
‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ म्हणत आहेत, “हा खेळ मानवी भावनांचा आहे. दोन्ही टीम भावनाशून्य होऊन खेळलात. त्यामुळे मी देखील आता भावनाशून्य होऊन”. घरातील सदस्य भावनाशून्य खेळल्याने बिग बॉस सदस्यांना काय शिक्षा देणार हे पाहावे लागेल. आता ‘बिग बॉस’ या दोन्ही गटांवर भडकले असून दोन्ही गटांनी खेळात घोडचूक करत घरात आलेल्या पाहुण्यांना हानी पोहोचवली म्हणून ते भडकले आहेत.