शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Paaru Marathi Serial : आदित्य लवकरच लग्नबंधनात अडकणार, अहिल्यादेवींना सांगितलं कशी हवी आहे मुलगी?, पारूला सहन होणार का?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 12, 2024 | 6:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru Serial Update

पारू मालिकेत अहिल्यादेवी आदित्यसाठी शोधणार मुलगी, पारूची निवड होईल का?

‘पारू’ मालिकेत एका मागोमाग रंजक वळणे येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत सध्या सगळेचजण मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसले. किर्लोस्कर बंगल्यात सावित्रीची मंगळागौर अगदी थाटामाटात संपन्न झाली. मात्र, आदित्य बरोबरच्या लग्नाचे सत्य अद्याप सगळ्यांनी लपवून ठेवलं आहे. तर हे सत्य फक्त सावित्रीला माहित आहे. लग्नाच सत्य लपवून ठेवून पारू आदित्यची सुरक्षा कवच म्हणून साथ देताना दिसत आहे. ज्या क्षणी पारूने गळ्यातील मंगळसूत्र काढलं त्याक्षणी आदित्यच्या जीवाला धोका निर्माण होतो. आणि याचे अनेक क्षण अनुभवले आहेत.अहिल्यादेवींना फक्त ऍड शूटसाठी लग्न केले हे कळालं तेव्हा त्यांनी आदित्य बरोबर बोलणं टाकून दिलं होतं.(Paaru Serial Update)

त्यामुळे ही गोष्ट आता अहिल्या देवींना सांगून चालणार नाही आणि आदित्य सरही हे सत्य मेनी करणार नाहीत असं पारूला वाटतं. त्यामुळे ती हे सत्य सर्वांपासून लपवून ठेवते. अहिल्या देवींना, किर्लोस्कर कुटुंबाला त्रास होईल असं काहीच वागायचं नाही असं पारू ठरवते.मालिकेच्या एका नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पारू सतत पुढे पुढे करते असं दिशा व दामिनीच म्हणणं असतं. मंगळागौरीच्या कार्यक्रमातही पारूमुळे दिशा दामिनीचा डाव फसतो आणि त्यांच्यावरच उलटतो. अहिल्यादेवीसमोर दिशा दामिनीला खोटं ठरवत पुन्हा एकदा त्यांना तोंडावर पाडते. हा सगळा राग लक्षात ठेवून दिशा व दामिनी पारूचा बदला घ्यायचा ठरवते.

आणखी वाचा – “अजून एक आठवडा संधी मला मिळायला हवी होती”, पुरुषोत्तम दादा पाटील यांचं मोठं वक्तव्य, Bigg Boss Marathi काय निर्णय घेणार?

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

पारू हा आपल्या यशामधील काटा आहे आणि तो काढूनच टाकायला हवा असं म्हणत नवा डाव आखते. त्यामुळे ती पारूचे फोटो शूट करायचे ठरवते आणि सांगते की, “मी तिचं असं काही फोटो शूट करेन की तिला तोंड दाखवायला जागा उरणार नाही आणि तिची इमेज सर्वांसमोर येईल”. तर या गोष्टीला दामिनी दिशाला साथ देते. तर इकडे अहिल्यादेवी व श्रीकांत बोलत असतात.

आणखी वाचा – “एका वर्षात आई गेली अन्…”, हक्काचं घर बघायला आईच नसल्याचं अंशुमन विचारेला दुःख, बोलताना रडू अनावर, म्हणाला, “चाळीत आयुष्य…”

तेव्हा अहिल्यादेवी गुरुजींनी आपल्याला सांगितलं होतं की, आदित्यच सुरक्षा कवच हे त्याच रक्षण करत आहेत.आणि हे सुरक्षा कवच त्याच्या आजूबाजूला आहे. त्यामुळे आता आदित्यला मुलगी शोधायला हवी. अहिल्यादेवी आदित्य समोर येतात आणि म्हणतात की, आता तुझं लग्न करायचं आहे. मुलगी शोधायला हवी. त्यावर आदित्य अहिल्यादेवींना आरशासमोर नेतो आणि म्हणतो की, मला अशीच मुलगी हवी आहे. अगदी तुझी सावली. तितक्यात तिथं पारू येते. आता अहिल्यादेवी आदित्यसाठी मुलगी शोधणार का?, आणि त्या सून म्हणून पारूची निवड करणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: marathi serialpaaru marathi serialPaaru Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Abhijeet Kelkar Video viral

Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेता व त्याच्या मुलांचा साधेपणा, दुकानात जाऊन स्वतः घडवली बाप्पाची मुर्ती अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.