शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“२०२२मध्ये मी law साठी प्रवेश घेणार होते पण…”, जुई गडकरीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “माझ्या आईचं स्वप्न…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 2, 2025 | 5:28 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tharala tar mag fame actress Jui Gadkari commented that she wants to study law in the subject of criminal law

जुई गडकरीला Law या विषयात Criminal Law मध्ये शिक्षण घेण्याची होती इच्छा, अभिनेत्रीने स्वत:च केलं भाष्य

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. ‘पुढचं पाऊल’ मालिकेद्वारे तिने मनोरंजन क्षेत्रात तिचं पहिलं पाऊल टाकलं. यानंतर अभिनेत्रीची या क्षेत्रातील घोडदौडही अजूनही चालूच आहे. जुई ही गेली अनेक वर्ष टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहेच, पण अभिनयात उत्तम असणारी जुई शिक्षणातही हुशार होती आणि याबद्दल तिने स्वत:चा अनेकदा भाष्य केलं आहे. जुई गडकरीने आपलं पदवीपर्यंतच शिक्षण BMM मध्ये पूर्ण केलं आहे. Advertising या विषयात पदवी संपादन करत जुईने मुंबई विद्यापीठाचं सुवर्ण पदक मिळवलं आहे. (Jui Gadkari on her education)

तसंच जुई २००९ मध्ये मुंबई विद्यापीठाची टॉपरही होती. यानंतर जुईने पदव्युत्तर पदवी Advertising And PR या विषयात संपादन केली आहे. याशिवाय अभिनेत्रीने तिचं MBA मार्केटिंगमध्ये पूर्ण केलंय. याला जोडून जुईने तिचा डिप्लोमा डिजिटल मार्केटिंग विषयात पूर्ण केला आहे. इतकं शिक्षण घेऊनही तिला Law (कायदा) या विषयात शिक्षण घेण्याची इच्छा होती आणि याबद्दल तिने स्वत:च भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – “मी हार मानलेली असताना…”, नववर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान अंकिता वालावलरकची नवऱ्यासाठी खास पोस्ट, म्हणाली, “हा माणूस मला…”

जुई गडकरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट्स, शूटिंगच्या सेटवरची धमाल, ‘ठरलं तर मग’ मालिकेचे प्रोमो ती नेहमी शेअर करते. नुकतंच तिने आस्क मी सेशन केलं ज्यात तिला Law शिक्षणाविषयी विचारण्यात आले. नेटकऱ्याने जुईला “मॅडम तुम्हाला Law मध्ये करियर करायला आवडलं असतं का? व त्यात तुम्ही क्रिमिनलमध्ये प्रॅक्टिस केली असती का? सिव्हिल मध्ये?” असा प्रश्न विचारला. याचे उत्तर देत जुईने नक्कीच आवडले असे असं म्हटलं.

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचं शिक्षण किती?, प्रश्न विचारताच म्हणाली, “मीडियाशी संबंधित…”

याबद्दल जुई पुढे असं म्हणाली की, “२०२२ मध्ये मी Law साठी प्रवेश घेणार होते. पण २ दिवसांसाठी माझी प्रवेश परीक्षेची तारीख चुकली आणि मला ठरलं तर मग ही मालिका मिळाली. माझ्या आईचं स्वप्न होतं की, मी फौजदारी कायदा (Criminal Law) शिकावं आणि मला पण ते करायला आवडलं असतं. पण मला आता माझी फौजदारी कायदा (Criminal Law) शिकण्याची इच्छा मालिकेत पात्र साकारुन पूर्ण करायला नक्की आवडेल”.

Tags: Jui Gadkari on her educationtharala tar mag fame jui gadkariTharala tar mag fame Jui Gadkari education
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Ankita Walawalkar expressed her anger on a social media page saying that she would not like a business using my name.

"माझं नाव वापरुन व्यवसाय करु नका", मुंडावळ्या बनवणाऱ्या व्यक्तीवर भडकली अंकिता वालावलकर, म्हणाली, "खोटं बोलून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.