‘ठरलं तर मग’ मालिकेतल्या साध्या, सोज्वळ सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने गेल्या काही वर्षांत आपल्या अभिनयाने प्रत्येकाचं मन जिंकलं आहे. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. जुईची ‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपीच्या शर्यतीतसुद्धा अग्रस्थानी आहे. त्यामुळे छोट्या पडद्यावरची लाडकी सून म्हणून तिला घराघरांत ओळखलं जातं. मालिकाविश्व गाजवणारी जुई ही सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावर जुई अनेकदा तिचे फोटो शेअर करताना दिसते. तसंच नवीन प्रोजेक्टबाबतही ती चाहत्यांना पोस्टद्वारे अपडेट देत असते. (jui gadkari education)
सेटवरची धमाल, ‘ठरलं तर मग’ मालिकेचे प्रोमो जुई आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असते. नवीन वर्षानिमित्त जुईने चंहत्यांशी संवाद साधला. नुकतंच इन्स्टाग्रामवर तिने ‘आस्क मी सेशन’ घेऊन चाहत्यांशी गप्पा मारल्या. यावेळी जुईच्या अनेक चाहत्यांनी जुईला तिच्या संबंधित काही प्रश्न विचारले. अभिनेत्रीला एका चाहत्याने तिच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल प्रश्न विचारला. याचे उत्तर देताना जुईने तिने कोणत्या विषयात पदवी संपादन केलीये याचा खुलासा केला.

आणखी वाचा – ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार, सोशल मीडियावर शेअर केली लग्नपत्रिका, कधी करणार लग्न?
यावेळी नेटकऱ्याने जुईला “तुम्ही बीएमएम केलं आहे का? त्याचे काही फायदे आहेत का?” असा प्रश्न विचारला. यावर तिने असं उत्तर दिलं की, “होय! मी मुंबई विद्यापीठ २००९ च्या बॅचची टॉपर आहे! बी.ए.एम. (जाहिरात)मध्ये मी बी.एम.एम. केलं आहे. हा एक पदवी अभ्यासक्रम आहे. जर तुम्हाला ते सामान्य जीवन आवडत नसेल, तर फक्त बी.एम.एम. कोर्समध्ये जा. मग तुम्ही खरे स्वप्न जगण्यास सुरुवात कराल! हा कोर्स तुम्हाला मीडियाशी अतिशय व्यावहारिक ज्ञान देतं. मी या कोर्स डिझाइनच्या प्रेमात आहे”.
दरम्यान, ‘पुढचं पाऊल’ नंतर जुई अनेक मालिकांमध्ये दिसली होती. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘वर्तुळ’, ‘सरस्वती’ या मालिकांमध्ये ती झळकली. ‘बिग बॉस मराठी’मध्येही जुई सहभागी झाली होती. त्यामुळे आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये झळकणारी जुई गडकरी आता मोठ्या पडद्यावर चित्रपटांमधून कधी पाहायला मिळणार? याची चाहते वाट पाहत आहेत.