स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. ‘पुढचं पाऊल’ मालिकेद्वारे तिने मनोरंजन क्षेत्रात तिचं पहिलं पाऊल टाकलं. यानंतर अभिनेत्रीची या क्षेत्रातील घोडदौडही अजूनही चालूच आहे. जुई ही गेली अनेक वर्ष टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहेच, पण अभिनयात उत्तम असणारी जुई शिक्षणातही हुशार होती आणि याबद्दल तिने स्वत:चा अनेकदा भाष्य केलं आहे. जुई गडकरीने आपलं पदवीपर्यंतच शिक्षण BMM मध्ये पूर्ण केलं आहे. Advertising या विषयात पदवी संपादन करत जुईने मुंबई विद्यापीठाचं सुवर्ण पदक मिळवलं आहे. (Jui Gadkari on her education)
तसंच जुई २००९ मध्ये मुंबई विद्यापीठाची टॉपरही होती. यानंतर जुईने पदव्युत्तर पदवी Advertising And PR या विषयात संपादन केली आहे. याशिवाय अभिनेत्रीने तिचं MBA मार्केटिंगमध्ये पूर्ण केलंय. याला जोडून जुईने तिचा डिप्लोमा डिजिटल मार्केटिंग विषयात पूर्ण केला आहे. इतकं शिक्षण घेऊनही तिला Law (कायदा) या विषयात शिक्षण घेण्याची इच्छा होती आणि याबद्दल तिने स्वत:च भाष्य केलं आहे.

जुई गडकरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट्स, शूटिंगच्या सेटवरची धमाल, ‘ठरलं तर मग’ मालिकेचे प्रोमो ती नेहमी शेअर करते. नुकतंच तिने आस्क मी सेशन केलं ज्यात तिला Law शिक्षणाविषयी विचारण्यात आले. नेटकऱ्याने जुईला “मॅडम तुम्हाला Law मध्ये करियर करायला आवडलं असतं का? व त्यात तुम्ही क्रिमिनलमध्ये प्रॅक्टिस केली असती का? सिव्हिल मध्ये?” असा प्रश्न विचारला. याचे उत्तर देत जुईने नक्कीच आवडले असे असं म्हटलं.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचं शिक्षण किती?, प्रश्न विचारताच म्हणाली, “मीडियाशी संबंधित…”
याबद्दल जुई पुढे असं म्हणाली की, “२०२२ मध्ये मी Law साठी प्रवेश घेणार होते. पण २ दिवसांसाठी माझी प्रवेश परीक्षेची तारीख चुकली आणि मला ठरलं तर मग ही मालिका मिळाली. माझ्या आईचं स्वप्न होतं की, मी फौजदारी कायदा (Criminal Law) शिकावं आणि मला पण ते करायला आवडलं असतं. पण मला आता माझी फौजदारी कायदा (Criminal Law) शिकण्याची इच्छा मालिकेत पात्र साकारुन पूर्ण करायला नक्की आवडेल”.