‘बिग बॉस मराठी सीझन ५’ची स्पर्धक ‘कोकण हार्टेड गर्ल’ने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. बिग बॉस मध्ये असताना ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरने तिच्या लग्नाविषयी भाष्य केलं होतं. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर अंकिताने तिच्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख सर्वांना करून दिली होती. त्यानंतर आता ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अंकिता येत्या काही दिवसात लग्न करणार असल्याची शक्यता आहे. तिच्या लग्नाची पत्रिकादेखील छापण्यात आली आहे. अंकिता ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. (Ankita Walawalkar on husband Kunal Bhagat)
काही दिवसांपूर्वी तिने लग्नपत्रिकेची झलक शेअर केली होती. अंकिताने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोमध्ये केळीच्या पानांवर तिचे व कुणालचे नाव लिहिले असल्याचे पाहायला मिळत आहे. कुलदेवत व आजोळच्या देवाला तिने लग्नाची ही पहिली पत्रिका अर्पण केली होती. त्यानंतर आता अंकिताने नुकतंच होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत आणि त्याच्यासाठी एक विशेष पोस्टही लिहिली आहे.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा ‘कार’नामा, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घेतली महागडी आलिशान कार, फोटो व्हायरल
अंकिताने कुणालबरोबरचे फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “देवाने मला जवळजवळ हार मानताना पाहिले, म्हणून त्याने मला सर्वात परिपूर्ण माणूस पाठवला. हा माणूस मला वाचवत आहे आणि या माणसासह मी आता नव्या वर्षात पदार्पण करत आहे. २०२५ मी तुझी वाट पाहत आहे”. अंकिताच्या या फोटोला अनेकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी तिच्या लग्नाबद्दल उत्सुकताही व्यक्त केली आहे.
आणखी वाचा – ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार, सोशल मीडियावर शेअर केली लग्नपत्रिका, कधी करणार लग्न?
अंकिताच्या घरी सध्या लग्नाची घाई सुरू आहे. लवकरच अंकिता लग्न करणार असल्याचे म्हटलं जात आहे. अंकिताचा नवरा हा मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध संगीतकार आहे. त्याचे नाव कुणाल भगत असं आहे. कुणाल करणबरोबर संगीत देण्याचे काम करतो, त्याने आजवर अनेक चित्रपटांना संगीत दिलं आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘येक नंबर’ चित्रपटाच्या संगीताचे कौतुक झाले होते. तसंच झी मराठीवरील काही मालिकाच्या शीर्षकगीतांनाही त्याने संगीत दिले आहे