‘ठरलं तर मग’ मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असून सध्या मालिकेत एकामागोमाग एक ट्विस्ट येतंच आहेत. मालिकेत सध्या सायली अर्जुनला बाळ होणार असल्याचं दाखवण्यात येत आहे. सायलीला उलट्या होत असतात त्यावरून कल्पना अंदाज बांधते की सायली प्रेग्नेंट आहे. मात्र सायली व अर्जुन असं काही नसल्याचं सांगतात. त्यानंतर अर्जुन सायलीला दवाखान्यात घेऊन घेतो. दवाखान्यातून घरी येताच कल्पना थेट दोघांना पेढा भरवून त्यांचं अभिनंदन करते. ते आई-बाबा होणार असल्याचं ती रिपोर्ट्स येण्याआधीच त्यांना सांगते, तेव्हा अर्जुन-सायलीला धक्काच बसतो. अर्जुन कल्पनाला म्हणतो की, ‘आपण रिपोर्ट्सची प्रतीक्षा करावी’. सायलीही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते की, ‘असं काही नाहीये’, मात्र कल्पना भविष्यातील आनंदात रमून गेलेली असते. (Tharal Tar Mag Todays Episode)
त्यानंतर अर्जुन सायलीला समजावतो की, ‘त्याच्या आईला जे काही वाटतंय ते उद्या रिपोर्ट येईपर्यंतच असेल’. तर इकडे सायलीला आपण फसवणु करून खूप मोठा अपराध करत आहोत असं सतत वाटत असतं. ती असं म्हणते की, ‘उद्या रिपोर्ट आल्यानंतर त्यांचा अपेक्षाभंग होणार आहे, तो आपण कसा सहन करणार आहोत’. तर इकडे कल्पना बाळ येणार या आनंदात रमून गेलेली असते. त्याचवेळी अस्मिता प्रियाकडे चुगली करते. प्रियाला फोन करुन ती सांगते की, ‘तिच्या आईला सायली प्रेग्नंट असल्याची शंका आहे’.
रिपोर्ट्स यायला अवधी असतो, रात्रभर कल्पना रिपोर्ट्सची वाट पाहत असते. शेवटी ती न राहवून सायलीच्या डॉक्टरांना फोन करते. तेव्हा डॉक्टरही सांगतात की, ‘तुमची सून प्रेग्नंट आहे’. हे ऐकल्यावर कल्पनाचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि ती सर्वांना ही आनंदाची बातमी सांगते. हे ऐकल्यावर मात्र अर्जुन-सायलीच्या पायाखालची जमीन सरकते. घरातील सर्वांना अतिशय आनंद झालेला असतो. त्यावेळी अर्जुन विचार करतो की, काहीतरी गडबड नक्की आहे.
अस्मिता मुद्दाम अर्जुन-सायलीच्या चेहऱ्यावर आनंद का दिसत नाही? असं मनात म्हणते आणि त्यांच्याजवळ जाऊन त्यांना थेट विचारते की, ‘तुम्हाला असं वागताना पाहून एखाद्याला वाटेल की तुम्ही लग्नाचं नाटक करताय’. त्यावेळी अर्जुन-सायलीही काहीही न बोलता इतरांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ लागतात. कल्पनाही सायलीला सल्ले देताना दिसते. तर सायली अर्जुनच्या या आनंदात पूर्णा आजीही सहभागी होते, हे पाहून मात्र सायली-अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो.