‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, अर्जुनने कोर्टात उत्तम कामगिरी केल्याबद्दल कल्पना आमरसाचा बेत करते. त्यावेळी सायली कल्पनाला म्हणते की, तुम्हालाही अभिमान वाटला असता तुम्ही कोर्टात आला असता तर, असं म्हणते. चैतन्यबद्दल कल्पनाशी अर्जुन साक्षी बोलत असतात तेवढ्यात तिथे नेमकी अस्मिता येते आणि अर्जुनला दाट संशय येतो की हिने खरं ऐकलं असणार. अस्मिता मात्र आश्रमातील बेवारशी कुणीतरी येणार असल्याचा पोकळ आरोप सायलीवर करते. त्यावर कल्पना तिला कठोर शब्दात सुनावते. (Tharal Tar Mag Serial Update)
अस्मिता विमलला आमरस माझ्या खोलीत आण असं सांगून रागाने तिथून निघून जाते. अर्जुन कल्पनाला चैतन्यमुळे मधु भाऊ केस लवकर सुटेल आणि आमची सेकंड इनिंग सुरु होईल, असं सांगतो. ते बोलणं दाराच्या आडून अस्मिता ऐकते. दुसरीकडे चैतन्य कोर्टात साक्षी दोषी सिद्ध झाल्याने साक्षीवर प्रचंड चिडतो. त्यानंतर चैतन्य व साक्षी बोलत असतात, तेव्हा चैतन्य साक्षीला सांगतो की, मी तुला शेवटची संधी देत असून सर्व खरं आतातरी मला सांग असं रागात सांगतो. त्यावर साक्षी त्याच्या पाया पडून प्रेमाचं नाटक करते. चैतन्य मात्र माझा गमावलेला विश्वास पुन्हा मिळवायचा असल्यास तुला सर्व विलासच्या खुनाच्या रात्रीचं खरं मला सांगावंच लागेल असं साक्षीला सांगतो. त्यावर साक्षी मी सांगितलं तर तू त्यातून मला बाहेर काढशील ना?, असं चैतन्यला विचारते. चैतन्यसुद्धा शपथ घेऊन सगळ्यातून बाहेर काढण्याचा विश्वास साक्षीला देतो. दुसरीकडे नागराज आणि प्रिया प्रतिमासाठीची डेड बॉडी मिळवतात. दुसरीकडे अर्जुन सायलीला साक्षीने कोर्टात खोटं बोलल्याचं उघड झाल्याचं सांगतो. शिवाय आता तिने त्या दिवशी रात्री वात्सल्य आश्रमात जाऊन विलासचा खून केला याचीही तिने कबुली दिली पाहिजे.
पण आपण हे इतके दिवस प्रयत्न करून सिद्ध होत नाही आहे, असं सायली अर्जुनला सांगत काळजी व्यक्त करते. तर एकीकडे साक्षी मी विलासचा खून अजिबात न केल्याचं चैतन्यला सांगते. त्यामुळे चैतन्यसमोर नवा पेच निर्माण होतो. इकडे नागराज प्रतिमाच्या चितेवर आपण आपली पोळी भाजून घ्यायची असं प्रियाला सांगतो. आणि ते दोघे नवा डाव आखतात. साक्षीबद्दल बोलायला अर्जुन चैतन्यला फोन करतो. पण चैतन्य मित्राचा फोन आल्याचं नाटक करतो, साक्षी मात्र एकीकडे अर्जुनने कोर्टात सादर केलेला पुरावा निस्तरू की चैतन्यला समजावून या द्विधा मनस्थितीत अडकते. चैतन्य घरातून बाहेर येऊन अर्जुनशी फोनवर बोलतो. अर्जुन साक्षी काही बोलली का असं विचारतो पण चैतन्य ती अजिबात बोलली नाही, तिने इतकं होऊन काहीही कबूल केलं नसल्याचं त्याला सांगतो.
आता मालिकेच्या पुढील भागात आपण असे पाहणार आहोत की, कल्पना सायलीला अर्जुनचे लहानपणीचे कपडे दाखवते आणि त्या आठवणीत रमते. त्यानंतर ती अर्जुनला घरी जास्त वेळ द्यायला तसेच सायलीला दुखवायचं नाही असंही ठणकावून सांगते.