झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील एजे व लीलाची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडतेय. एजे व लीला ही एकमेकांच्या विरोधी स्वभावाची जोडी एकत्र येईल का, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या मालिकेचे कथानक थोडे हटके असून दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता खूप वाढत आहे. या मालिकेत राकेश बापट हा एजे म्हणजे अभिराम जहागीरदार व वल्लरी लोंढे ही लीलाची भूमिका साकारत आहे. मालिकेत दिवसेंदिवस येणाऱ्या वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
अशातच मालिकेच्या नवीन प्रोमोने लक्ष वेधून घेतल आहे. मालिकेत सध्या अभिराम व श्वेता यांच्या लग्नाचे कथानक सुरु आहे. अशातच आता अभिराम व श्वेताऐवजी अभिराम व लीला यांचे लग्न होणार असल्याच्या ट्विस्टचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. मालिकेत एजे व लीला यांच्या लग्नाचा ट्विस्टचा प्रोमो शेअर करण्यात आला होता. यावेळी लीलाच्या बहिणीला किडनॅप करण्यात आल्याचे कळले होते. याबद्दलचाच एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
एजेच्या लग्नात विक्रांत देशमुख एका ज्यूसमध्ये गुंगीचे औषध टाकून ते लीलाच्या बहिणीला देतो. ज्यामुळे ती बेशुद्ध पडते. तिच्या बेशुद्ध पडल्यानंतर विक्रांत तिला किडनॅप करून लीला फोन करतो व तिला एका श्रीमंत माणसाशी लग्न करायला सांगतो. यावर लीला “मी कुणाशी लग्न करु” असं म्हणते. यावर विक्रांत तिला एजेशी लग्न करण्याचे सुचवतो. तू जर एजेशी लग्न केलंस तरच मी तुझ्या बहिणीला सोडेन” असं म्हणतो. त्यामुळे ती एजेबरोबर लग्न करायला तयार होते.
दरम्यान, गेले काही दिवस लीला व एजेंच्या यांच्या लग्नाविषयी सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. याआधी लीलाने मेहंदी सोहळ्यातून पळ काढला होता. दिल्या वचनाला लीला जागली नसल्यामुळे आता अभिराम देखील तिच्यावर चिडला होता. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागात काय पाहायला मिळणार?, एजे व लीला यांचे लग्न खरंच होणार की? यात आणखी काय नवीन तवसीत येणार? याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.