गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अर्जुन-चैतन्य साक्षीचं पितळ उघडं पाडणार?, सायलीचीही मधुभाऊंच्या केससाठी मोठी मदत, मोठा पुरावा थेट घरीच आणला

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 27, 2024 | 10:10 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharal Tar Mag Serial Update

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, जेलमध्ये महीपत भेटायला आलेल्या साक्षीला अर्जुन सायलीच्या खोट्या लग्नाचे पुरावे मिळवायला लवकरात लवकर स्वतःलाच बाहेर पडावं लागेल असं सांगतो. शिवाय सायलीच अर्जुनच्या आयुष्यात नसेल तर अर्जुन कुठल्याही केसमध्ये येऊ शकत नाही असं सुद्धा महीपत साक्षीला सांगतो. दुसरीकडे अर्जुन, सायली व चैतन्य महीपतच्या घरी साक्षी महीपत विरोधी पुरावे शोधताना तिथे अचानक नेमकी साक्षी येते. तेव्हा चैतन्य-अर्जुन एकमेकांशी वाद घालायचं नाटक करतात आणि सायलीसुद्धा त्यांना समजवायच नाटक करते. (Tharal Tar Mag Serial Update)

त्यावेळी साक्षी हे काय सुरु असल्याचं चैतन्यला विचारते. तेव्हा चैतन्य कल्पना मावशीचा लग्न करण्याचा निरोप घेऊन सायली-अर्जुन आले असल्याचं सांगतात. आणि इथे येऊन सल्ले देत असल्याचंही साक्षीला चैतन्य सांगतो. चैतन्य साक्षीला सांगतो, कुणीही सांगूदेत पण आपण लग्न करायला हवं. त्यावर साक्षी मनातल्या मनात तुझ्याशी साखरपुड्याच नाटक अर्जुनला कमकुवत बनवायला आहे नाहीतर तुला दारातही थारा दिला नसता असं म्हणते.

आणखी वाचा – अहिल्यादेवींचा ऍडशूटसाठी होकार, दिशा-दामिनीची नवी चाल, प्रोजेक्ट होईल का पूर्ण?

View this post on Instagram

A post shared by सीरियल जत्रा (@serialjatra)

यानंतर चैतन्य आपल्या खोलीत साक्षीसाठी खास कॅन्डल लाईट डिनरच आयोजन करतो आणि तेव्हा मुद्दाम कारण सांगून साक्षीला तो तिथून आत पाठवतो. या दरम्यान चैतन्य साक्षीच्या ड्रिंकमध्ये झोपेची गोळी टाकतो आणि सेल्फी घेण्यासाठी साक्षीला फोन अनलॉक करायला लावतो. पुढे ती झोपल्यावर तिचा फोन चैतन्य चेक करतो. तेव्हा चैतन्यला हवे असलेले पुरावे सापडतात. तो लगेच स्वतःच्या फोनमध्ये ते पुरावे घेऊन ठेवतो आणि अर्जुनला पुरावे सापडले असून ऑफिसमध्ये भेटण्याचे कळवतो.

आणखी वाचा – ‘सिंह’ व ‘तूळ’ राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होणार, इतर राशींच्या नशिबात नेमकं काय? जाणून घ्या…

एकीकडे नागराजला प्रिया प्रतिमाच्या डेड बॉडीसाठी हॉस्पिटलला यायला तयार करते. दुसरीकडे अर्जुन सायलीला चैतन्यने मिळवलेले सर्व महत्वाचे पुरावे दाखवतो. त्यापुढे अर्जुन-सायली चैतन्यचं तोंड भरुन कौतुक करतात. शिवाय अर्जुन शिवानी जाधव भेटली तर केससाठी आणखी मदत होईल, असं चैतन्यला सांगतो. सायली लगेच शिवानी जाधवच्या घरी जाते. आता मालिकेच्या पुढील भागात असे पाहणार आहोत की, शिवानीला सायली-अर्जुन घरी घेऊन येतात आणि घरच्यांना सायली ही आश्रमातली मैत्रीण असल्याचं सांगते शिवाय आज आपल्याकडेच राहणार असल्याचंसुद्धा ती सांगते.

Tags: marathi serialstar pravahtharal tar magTharal Tar Mag Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Ashwini Kasar Shared Experience

"मला लाथ मारली आणि…", सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला लोकल ट्रेनमध्ये महिलेकडून वाईट वागणूक, म्हणाली, "मराठी भाषा वापरली तर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.