रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अहिल्यादेवींचा ऍडशूटसाठी होकार, दिशा-दामिनीची नवी चाल, प्रोजेक्ट होईल का पूर्ण?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 27, 2024 | 9:35 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Serial Update

अहिल्यादेवींचा ऍडशूटसाठी होकार, दिशा-दामिनीची नवी चाल, प्रोजेक्ट होईल का पूर्ण?

‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, प्रीतम आणि आदित्य एकत्र असतात तेव्हा आदित्यला फॉरेनच्या एका कंपनीतून फोन येतो आणि त्यांच्या कंपनीबरोबर कोलॅब्रेशन करायचं असल्याचं ते सांगतात. हे ऐकून आदित्य खूपच खुश होतो आणि होकार कळवतो. त्यानंतर आदित्य प्रीतमला ही आनंदाची बातमी सांगतो आणि सांगतो की हे प्रोजेक्ट तू लीड करशील यावर प्रीतम म्हणतो की, आईला हे चालेल का?, तेव्हा आदित्य आणि प्रीतम दोघेही अहिल्यादेवींकडे जातात आणि अहिल्यादेवीना ही आनंदाची बातमी सांगतात. (Paaru Serial Update)

यावर अहिल्यादेवी ही प्रीतमला हा प्रोजेक्ट लीड करण्यास परवानगी देतात. त्यावेळेला अहिल्यादेवी सांगतात की, इंडियातले सगळ्यात बेस्ट मॉडेल या प्रोजेक्टसाठी तुम्ही घ्या. यावर आदित्य सांगतो नाही आई या प्रोजेक्टसाठी त्यांना आपली ब्रँड अँबेसेडर पारूच हवी आहे. यावर अहिल्यादेवी नकार देतात आणि सांगतात की, पारू या प्रोजेक्टमध्ये काम करणार नाही मग आपलं लाखोंचं, करोडोंच नुकसान झालं तरी मला काही फरक पडत नाही, कारण पारू ही एक सर्वसामान्य मुलगी आहे आणि तिच्यासाठी लग्नही एक भावना आहे. त्यामुळे तिच्या भावनांशी खेळलेलं मला बिलकुल चालणार नाही. यानंतर प्रीतम व आदित्य सांगतात की, आम्ही पारुला समजावतो त्यावर अहिल्यादेवी नकारच देतात. मात्र अहिल्यादेवींच्या लक्षात येतं की पारू समोर जर तिचा होणारा नवरा हरीश असेल तर कदाचित तिला त्याने तितकासा फरक पडणार नाही.

आणखी वाचा – हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ, संसार वाऱ्यावर, क्रिकेटरच्या बायकोचं घटस्फोटासबंधीत मोठं विधान, म्हणाली, “रस्त्यावर येणार…”

यावर आदित्य ही आयडिया चांगली असल्याचं सांगतो आणि हरीश आणि पारूला हे सगळं काही समजावून सांगतो. त्यानंतर इकडे पारू येते आणि सर्व काही तिच्या आत्याला सांगते तेव्हा तिची आत्या तिला लग्न म्हणजे नेमकं काय असतं खरं आणि खोटं लग्न यातला फरक समजावून सांगते. यावर पारूला लग्न म्हणजे नेमकं काय असतं, ते कसं होतं याची कल्पना येते आणि पारू खूपच खुश होते. त्यानंतर अहिल्यादेवीना त्या फॉरेनच्या कंपनीतील एका व्यक्तीचा फोन येतो तेव्हा ती व्यक्ती सांगते की, हे डील जर तुम्हाला मान्य असेल तर यात नंतर काहीच बदल होणार नाही आणि जर बदल झाला तर तुम्हाला खूप मोठा तोटा होऊ शकेल. यावर अहिल्यादेवी हा माझा शब्द आहे आणि हे डील पूर्ण होणारच आणि हे प्रोजेक्ट अगदी तुम्हाला हवं तसं आम्ही पूर्ण करूनच राहणार असा शब्द देतात. यानंतर त्या आदित्य आणि प्रीतमला कामाला लागायला सांगतात. त्यानंतर इकडे ही गोष्ट जेव्हा दामिनी दिशाला सांगते तेव्हा दिशाच्या पायाखालची जमीन सरकते. पारूला घेऊन अजून किती नाचणार आहेत, आता या वेळेला तरी त्यांना अद्दल यायलाच हवी त्याच्यामुळे हे प्रोजेक्ट व्हायलाच नको म्हणून दोघीही प्रयत्न करतात.

आणखी वाचा – “प्रत्येक गोष्ट धर्माकडे…”, चिन्मय मांडलेकरच्या मुलाच्या नावावरुन झालेल्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेने मांडलं मत, म्हणाला, “त्याला विरोध करायला…”

मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, या प्रोजेक्टसाठी हरीश जेव्हा नवरा मुलगा म्हणून तयार होतो तेव्हा दामिनी दिशाच्या सांगण्यावरून त्याच्या सरबतमध्ये काहीतरी मिक्स करते आणि त्यावर हरीशला चक्कर येऊन तो खाली पडतो. आता हरीशशिवाय हे प्रोजेक्ट पूर्ण होईल का?, हे सर्व पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.

Tags: marathi serialpaaru serialPaaru Serial Updatezee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Tharal Tar Mag Serial Update

अर्जुन-चैतन्य साक्षीचं पितळ उघडं पाडणार?, सायलीचीही मधुभाऊंच्या केससाठी मोठी मदत, मोठा पुरावा थेट घरीच आणला

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.