‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळत आहे की, कल्पना अर्जुनला सायलीची काळजी घेण्यासाठी, सायलीकडे विशेष लक्ष देण्यासाठी सांगते, मात्र ती हे असं का सांगते हे अर्जुनला काही कळत नाही. त्यानंतर अर्जुन व सायली रूममध्ये येतात तेव्हा अर्जुन सायलीला विचारतो की, आई असं का म्हणत होती. यावर सायली अर्जुनला त्याचा लहानपणीचा फोटो पाठवून सांगते की, यासाठीच त्या सांगत होता मात्र अर्जुनला तरीसुद्धा काही कळत नाही. त्यानंतर सायली उघड करत सांगते की, आई आपल्या बाळाची स्वप्न पाहत आहे आणि त्या बाळांच्या स्वप्नांमध्ये इतक्या गुंग झाल्या आहेत की, त्यांना याच्याशिवाय आणखी काही दिसतच नाही आपण काही केल तरी हा गैरसमज दूर करायला हवा नाहीतर हे फार कठीण होऊन बसेल. तेव्हा अर्जुनही होकार देतो त्यानंतर अर्जुन सायलीला कॉफी आणायला सांगतो. (Tharal Tar Mag Serial Update)
तेव्हा अर्जुन बाळाच्या स्वप्नांमध्ये गुंगून जातो आणि तो बाळांच्या स्वप्नांमध्ये दंग होतो. त्यांना एक बाळ होतं ते बाळ मोठं झाल्यावर बाळाला सायली कशी तयार करते, अर्जुन त्याला कसं शाळेत घेऊन जातो, त्या बाळासाठी होणारी दोघांची कसरत हे सगळं काही तो त्या स्वप्नात पाहतो. तितक्यात सायली येते आणि तो दचकून जागा होतो. अर्जुनला चिंता वाटते की, आपलं सुद्धा असं बाळ असेल का?, याची काळजी वाटत असते.
तर इकडे तन्वी इन्स्पेक्टरला फोन करून डेड बॉडी सापडली असल्याचं सांगते, त्यानंतर इन्स्पेक्टर डेड बॉडी येऊन चेक करतात तेव्हा त्यांना तिथं प्रतिमा सारख्याच खुणा सापडतात आणि तात्काळ ते रविराजला फोन करुन याबद्दल कळवतात. तर इकडे चैतन्य व साक्षी बोलत असतात तेव्हा साक्षी चैतन्य समोर खोटेपणाचा आव आणून रडण्याचं नाटक करते. तर चैतन्य आपली बॅग भरुन निघण्याच्या तयारीत असतो तेव्हा चैतन्य सांगतो की, मी किती दिवसांपासून तुला विचारत आहे की, त्या रात्री काय घडलं होतं, सगळं तू मला सविस्तर सांग पण तुला मला काही खरं सांगायचं नाही आहे. आपल्या प्रेमामध्ये आता खोटेपणाची भिंत उभी झाली आहे, हे ऐकल्यावर साक्षी खूपच घाबरते त्यावेळेला साक्षी रडत सांगते की, आज मी तुला सगळं काही खरं खरं सांगणार आहे, मात्र साक्षी असं सांगूनही काहीच खरं सांगत नाही, हे मात्र चैतन्यला स्पष्टपणे माहिती असतं तरी सुद्धा चैतन्य तिच्यावर विश्वास ठेवण्याचं नाटक करतो.
तर इकडे रविराजला इन्स्पेक्टरचा फोन आलेला असतो की आम्हाला एक डेड बॉडी सापडली आहे, त्याच्यावरील खुणा या प्रतिमा सारख्याच असल्याचं इन्स्पेक्टर सांगतात. यामुळे रविराजला खूपच टेन्शन आलेलं असतं, तर हे सत्य जेव्हा तन्वीला कळतं, तेव्हा तन्वी सुद्धा रडण्याचं नाटक करु लागते. तर तिकडे अर्जुन व सायली बाळाच्या स्वप्नांमध्ये रंगलेले असतात, तेव्हा ते बाळ नक्की कोणासारखे होणार यावरुन त्यांच्यात भांडण होतं. आता ही लुटुपटीची भांडण कल्पना बाहेरून ऐकत असते त्यामुळे कल्पनाचाही गैरसमज होतो की, दोघेही बाळाचा विचार करत आहेत, मालिकेच्या पुढील भागात आता काय घडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.