बुधवार, मे 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लीलाने विश्वासघात केल्याचा एजेंचा आरोप, बायको म्हणून स्वीकारणार का?, सूनांचा निर्णय काय असणार?

Saurabh Moreby Saurabh More
जून 6, 2024 | 10:50 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla marathi serial update AJ accused Leela of cheating on her after their marriage

लीलाने विश्वासघात केल्याचा एजेंचा आरोप, बायको म्हणून स्वीकारणार का?, सूनांचा निर्णय काय असणार?

झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेचे कथानक थोडे हटके असून दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता खूप वाढत आहे. या मालिकेत राकेश बापट हा एजे म्हणजे अभिराम जहागीरदार व वल्लरी लोंढे ही लीलाची भूमिका साकारत आहे. मालिकेत दिवसेंदिवस येणाऱ्या वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मालिकेत नुकताच एजे व श्वेता यांच्या लग्नाचे कथानक सुरु असल्याचे पाहायला मिळाले. मात्र एजे व श्वेताऐवजी एजे व लीला यांचे लग्न होणार असल्याच्या ट्विस्टने मालिकेत चांगलीच रंगत आणली.

लीलाला अभिरामच्या लग्नात बोलवण्यासाठी विक्रांतने रेवतीला किडनॅप केले आहे. रेवतीच्या जीवाची धमकी देत विक्रांतने लीलाला एजेच्या लग्नात बोलवलं आहे. त्यामुळे लीला आपल्या बहिणीच्या काळजीपोटी धावत धावत लग्नात पोहोचणार आहे. रेवतीला सुखरूप सोडवण्याच्या बदल्यात लीलाला एजेशी लग्न करावं लागणार आहे. मात्र, एजेचं लग्न काही वेळातच होणार असून, आपण तिथे कसं काय उभं राहणार, असा प्रश्न लीलाला पडला होता. मात्र, कशाचाही विचार न करता लीला धावत धावत मंडपापर्यंत पोहोचली आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा –

आणखी वाचा – वृषभ, कन्या, तूळ राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस भाग्याचा, महत्त्वाचे कामे पूर्ण होणार, जाणून घ्या…

अशातच आता मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये एजेला त्याचं लग्न श्वेताऐवजी लीलाशी झालेले कळत आहे. त्यामुळे तो तिच्यावडर भयंकर चिडल्याचे या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय लीला तिला तिच्या बहिणीच्या काळजीपोटी एजेशी लग्न करावे लागले असल्याचे समजावून सांगते. मात्र एजेला लीलावर विश्व बसत नाही. त्यामुळे एजे लीलाला तने त्याचा विश्वासघात केल्याचे बोलतात. तसेच यावेळी एजे लीलाला “माझी चूक झाली की मी तुझ्यावर विश्वास ठेवला” असं म्हणतात.

आणखी वाचा – “अनेकांनी काँग्रेस संपवण्याचे काम केले पण…”, रितेश देशमुखने विलासराव देशमुखांचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत, म्हणालेले, “बाकीचे लोक…”

त्यामुळे आता एजेचे श्वेताऐवजी लीलासह लग्न झाल्याने मालिकेत एक नवीन ट्विस्ट आला आहे. मात्र लीलाने एजेचा विश्वासघात केल्याचे त्यांना वाटत आहे. त्यामुळे आता मालिकेच्या आगामी भागात काय पाहायला मिळणार?, लीला एजेला पटवून देणार की, तिला हे लग्न का करावे लागले? तसेच लीलाला एजेच्या सूना घरात सांभाळून घेणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.   

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsNavri Mile Hitlerla
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dipika Kakar news
Entertainment

कॅन्सरशी लढताना सुप्रसिद्ध अभिनेत्री काय खाते?, आहारा’बद्दल सांगत म्हणाली, “हेल्दी फूड…”

मे 19, 2026 | 9:58 am
Cup Bashi Movie Teaser
Entertainment

नवऱ्याची नाहीतर सासूची पत्रिका जुळली पाहिजे; सूनेची अट पडणार का भारी?, ‘कपबशी’ चित्रपटाच्या टिझरने वाढवली उत्सुकता

मे 18, 2026 | 1:00 pm
K Rajan Passes Away
Entertainment

८५ वर्षीय सुप्रसिद्ध दिग्दर्शक-निर्मात्याची आत्महत्या, थेट नदीत उडी मारली आणि…; चित्रपटसृष्टीही हादरली

मे 18, 2026 | 11:00 am
Parag tyagi on shefali death
Entertainment

काळ्या जादूने शेफाली जरीवालाचा मृत्यू?, पतीचा मोठा खुलासा, म्हणाला, ” खूप विचित्र आणि…”

मे 18, 2026 | 9:43 am
Next Post
Rishi Saxena New serial

'काहे दिया परदेस' फेम ऋषी सक्सेनाची 'स्टार प्रवाह'च्या मालिकेत एन्ट्री, तब्बल सहा वर्षांनी कमबॅक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.