Tharala Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, सायली व कल्पना पूर्णा आईला आपण प्रतिमाची स्मृती परत आणण्यासाठी स्वयंपाक हा मोठा मार्ग असल्याचं म्हणतात. आणि त्या लांब उभ्या राहून ती कसा स्वयंपाक बनवते हे बघा, तुम्ही त्यांच्यासमोर आलात तर त्या घाबरतील असे समजावतात. पूर्णाआईसुद्धा लगेच या गोष्टीला तयार होते. दुसरीकडे तन्वीला म्हणजेच प्रियाला नागराज, रविराज माझ्याआधीच हॉस्पिटलला पोहोचून त्याच नर्सशी बोलत असल्याचे कळवतो. हे ऐकताच तन्वी खूपच घाबरते. इथे सायली, कल्पना आणि पूर्णा आई प्रतिमा यायची वाट पाहतात.
अखेर प्रतिमा येताच पूर्णा आई व कल्पना पुस्तक वाचायचे नाटक करतात. सायली विमलला गुळाबद्दल विचारताच ती अंदाज नसल्याचे सांगते. हे बघून प्रतिमा सायलीकडून गूळ घेत थोडाच घालायचा सांगते. शेवटी प्रतिमा स्वतःच आमटी करायला घेते. हे बघून समोर बसलेल्या पूर्णा आईला व कल्पनाला खूप बरं वाटतं. तिथे तेवढ्यात तन्वी येते पण तन्वीला पूर्णा आई गप्प राहायला सांगते. प्रतिमा मेथीची फोडणी देताच पूर्णा आई कल्पनाला ही प्रतिमाची खासियत असल्याचे सांगते. सायली प्रतिमाला मसाला कुठला घालायचा हे विचारताच प्रतिमा गोडा मसाला घालायचा असंही सांगते. आमटी तयार होताच सायली प्रतिमाला जेवायची विनंती करते.
पण प्रतिमा तिथून निघून जाते. तेवढ्यात रविराज तिथे पोहोचतो. सायली रविराजला प्रतिमाच्या हातची आमटी चाखायला सांगते. तन्वी पुढे येऊन रविराजला महत्वाचे काम संपले का असे विचारताच रविराज तन्वीला, “तुझ्याशी बोलायचे आहे”, असं सांगतो. खोलीत येऊन रविराज तन्वीला डीएनए रिपोर्ट्सचा आणि खोट्या डेडबॉडीचा छडा लावायला सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन नर्सला भेटल्याचे सांगतो.
तर दुसरीकडे सायली अर्जुनला लाडू व कॉफी देताच अर्जुन सायलीला तुझ्यात आणि प्रतिमा आत्यामध्ये साम्य असल्याचे सांगतो. मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, प्रतिमाने बनवलेली आमटीने सगळे जेवतात. रविराज तर आमटीचे भरभरुन कौतुक करतो. सायली प्रतिमाला हे सगळं गुपचूप दाखवते. आता रविराज तन्वी व नागराजची चोरी पकडणार का?, हे पाहणं रंजक ठरेल.