Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या धुमाकूळ पाहायला मिळत आहे. अल्पावधीतच या कार्यक्रमाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड केलं आहे. एकापेक्षा एक हे स्पर्धक असून ते उत्तम खेळ खेळताना दिसत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात दोन गट पडले असून दोन्ही गटांत टास्कमध्ये बराच वाद पाहायला मिळतो. ‘बिग बॉस’ मध्ये यंदा केवळ कलाकारांना नव्हे तर रील स्टार, रॅपर, गायक अशा विविध क्षेत्रातील कलाकारांना संधी दिली असून प्रत्येक क्षेत्रातील ही कलाकार मंडळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी उत्तम खेळ खेळताना दिसत आहेत.
‘बिग बॉस’च्या घरात दोन गट पडलेले पाहायला मिळत आहेत. पहिल्या गटात निक्की, अरबाज, जान्हवी, वैभव, घनःश्याम, इरिना हे सदस्य पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या गटात अभिजीत, वर्षा, पॅडी, सूरज, अंकिता, निखिल, योगिता, धनंजय हे कलाकार दिसत आहेत. दोन्ही गटात बरेच वाद सुरु असलेले पाहायला मिळाले. अशातच नॉमिनेशन प्रक्रियेत वैभवला पॉवर कार्ड मिळालं असून एका स्पर्धकाला नॉमिनेट करायची संधी मिळाली. यावेळी वैभवने नॉमिनेट प्रक्रियेत घेतलेला निर्णय त्याच्या टीममधील इतर स्पर्धकांना खटकला आहे.
या नॉमिनेशन प्रक्रियेत वैभवने घनःश्यामला सेफ केलं असून त्याने अभिजीतला नॉमिनेट केलं आहे. त्याचा हा निर्णय सह स्पर्धकांना खटकलेला पाहायला मिळत आहे. यावेळी वैभव म्हणतो, “मला घनःश्यामला सेफ करायचं आहे. त्याच्या जागी मी अभिजीतला नॉमिनेटला करत आहे”. वैभवचा हा निर्णय ऐकून निक्की, जान्हवी संतापतात. निक्की यावर म्हणते, “काय चुकीचा निर्णय घेतो. तू आमचीच मारली आहेस. तू तिच्याशी भांडतोस. तिला बाहेर काढायची ही सुवर्णसंधी होती”, असं म्हणते.
यावर जान्हवी निक्कीला म्हणते, “कुठल्या डोक्याने विचार करतात यार”, असं म्हणत चिडचिड करत पाय आपटते. तर निक्की व अरबाज बोलत असतात. तेव्हा निक्की अरबाजला बोलते, “मला असं वाटत की तिला कुस्ती खेळायला जमते गेम खेळायला जमत नाही”