‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की, सायली अर्जुनवर चिडलेलीच असते. कामातही सायलीचं अजिबात लक्ष लागत नाही त्यामुळे तिची प्रचंड चिडचिड होते. अर्जुनला मुद्दाम तिखट भाजी दिल्याचे वाईटही सायलीला वाटल्याने ती अर्जुनसाठी शिरा बनवायचं ठरवते. दुसरीकडे किल्लेदारला खिशात घालायची इच्छा नागराजकडे प्रिया बोलून दाखवते. प्रियाच्या वागण्यामुळे नागराजला राग येतो. इथे ऑफिसमध्ये चैतन्य अर्जुनला सायलीने तुझ्या आवडीची भेंडीची भाजी दिली असल्याचं सांगतो. तेवढ्यात सायली तिथे येते आणि भाजी न खाण्याबद्दल सायली अर्जुनला सांगते. (Tharal Tar Mag Serial Update)
त्यावरुन त्या दोघांमध्ये गमतीशीर भांडणही होतात. अखेर सायली भाजीत शिक्षा म्हणून तिखट जास्त घातल्याची कबुली देते. अर्जुन सायलीला नीट समजावतो आणि त्यामुळेच सायली अखेर अर्जुनला प्रियाबरोबर प्रेमाचं नाटक करण्याची परवानगी देते. अस्मिता सायलीवर घरात खायला बनवलं नाही म्हणून थोडी रागावते, पण पूर्णा आई सायली कशी चांगली हे अगदी छान समजूतीने सांगते आणि वरती तिलाच शेवयांचा उपमा बनवायला लावते. प्रियाला भेटण्यासाठी सायली सुमनला फोन करुन तिचा भेटण्याचा पत्ता विचारते.
इथे उपमा करता करता अस्मिताची चांगलीच तारांबळ उडते. तेवढ्यात कल्पनासुद्धा तिथे येऊन स्वतःही उपमा खाणार असल्याचे सांगते. सायली व अर्जुन सुमनने सांगितलेल्या कॅफेमध्ये येऊन बसतात आणि तिथे प्रिया येताच भांडायचे नाटक सुरु करतात. त्यांना तिथे बघून प्रिया म्हणजेच तन्वी एकदम चक्रावून जाते. सायली अर्जुन भांडतच राहतात आणि प्रिया दुरून नुसती हे पाहत मजा घेते. शेवटी अर्जुन सायलीला घरी यायचं तर ये तू योग्य सून नाही आहेस असं सांगतो. हे बघून प्रियाचा आनंद अजून वाढतो.
मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, जेवताना अर्जुन सायलीकडे लोणचं मागूनही ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत बाकी सगळ्यांना सगळं पानात वाढते. आता अर्जुन सायलीमधील हा वाद प्रियाला जाळ्यात कसा अडकवणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.