बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘शिवा’मधील दिव्या अभिनयाबरोबरच ‘या’ क्षेत्रातही आहे कार्यरत, खऱ्या आयुष्यात नेमकी कशी?, दिसते इतकी सुंदर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 11, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
shiva fame srushti bahekar

'शिवा'मधील दिव्या अभिनयाबरोबरच 'या' क्षेत्रातही आहे कार्यरत, खऱ्या आयुष्यात नेमकी कशी?, दिसते इतकी सुंदर

‘झी मराठी’वरील ‘शिवा’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची लाडकी मालिका ठरली आहे. या मालिकेत आलेल्या रंजक वळणांमुळे ही मालिका पाहणं प्रेक्षकांना रंजक ठरत आहे. शिवा व आशु यांचा संसार मालिकेत सुरु झालेला पाहायला मिळत आहे. सुरुवातीला आशुबरोबर दिव्याचं लग्न होणार होतं. मात्र आयत्यावेळी दिव्या भर मंडपातून पळून जाते. त्यामुळे भाऊंच्या आग्रहाखातर दिव्याच्या जागी शिवा उभी राहते. त्यामुळे शिवाचं आयुष्य पूर्णतः बदलून गेलेलंही पाहायला मिळालं. (shiva fame srushti bahekar)

मालिकेत दिव्या ही भूमिका अभिनेत्री सृष्टी बाहेकर साकारत आहे. मालिकेतील ही दिव्या नेहमीच अरेरावी करणारी, स्वार्थी, स्वतःच खरं करणारी आहे. मात्र खऱ्या आयुष्यात दिव्या नेहमी कशी आहे हे फार कमी जणांना ठाऊक असेल. इतकंच नव्हे तर दिव्या तिच्या खऱ्या आयुष्यात अभिनय नाही तर वेगळ्याच क्षेत्रात कार्यरत आहे. सोशल मीडियावरही सृष्टी बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.

आणखी वाचा – Breast Cancer मुळे हिना खानला मरण यातना, देवाकडे सतत करत आहे प्रार्थना, पोस्ट शेअर करत म्हणाली, “हे अल्लाह कृपया…”

View this post on Instagram

A post shared by Dr. Srushti Bahekar (@srushti_bahekar)

मालिकेतील नकारात्मक भूमिकेत दिसणारी दिव्या ही खऱ्या आयुष्यात पेशाने डॉक्टर आहे. डॉ. सृष्टी बहेकर ही शिवा मालिकेत दिव्याची भूमिका साकारत आहे. व्यवसायाने दंतचिकित्सक आणि मनापासून अभिनेत्री व नर्तिका असलेल्या सृष्टीला लहानपणापासूनच टेलिव्हिजनची आवड होती. तेव्हापासूनच तिने ठरवलं होतं की मोठे झाल्यावर आपण टीव्हीवर यायचं. पण शालेय शिक्षणात हुशार असल्याने सृष्टीने कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभाग दर्शवला. डान्सचे क्लास, नाटक अशा माध्यमातून तिने कलेची आवड जोपासली. शेवटच्या वर्षात शिकत असतानाच सृष्टीला ‘इंडिया के मस्त कलाकार’ या सोनी टीव्हीच्या रिऍलिटी शोमध्ये झळकण्याची संधी मिळाली. आणि या माध्यमातून तिचे अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले.

आणखी वाचा – अनंत अंबानीच्या लग्नाची जगावेगळी तयारी, पाहुण्यांना देणार गिफ्ट, एका भेटवस्तूची किंमत आहे तब्बल…

‘बैस ना ऐक ना’ या गाण्यात सृष्टीला प्रमुख भूमिका मिळाली. ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेनंतर सृष्टी आता ‘शिवा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेमुळे तिच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळताना दिसत आहे. दिव्याची भूमिका ही विरोधी असल्याने सृष्टीला नक्कीच प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागते पण खऱ्या आयुष्यात ती लोकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरवते, हे ही तितकेच खरे आहे.

Tags: entertainmentmarathi actressshiva fame srushti bahekarsrushti bahekarsrushti bahekar actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Paaru serial update

अखेर आदित्य-अहिल्यादेवी समोरासमोर, दामिनीची मोठी फजिती आणि…; मुलाखतीच्या प्लॅनचा संशय येणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.