Tharal Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहे. मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळत आहे की, अर्जुन आल्या आल्या रविराजला प्रतिमाच्या खोट्या डेड बॉडी बद्दल विचारतो. तर इकडे सायली दिसत नसल्याने पूर्णा आजी तिच्याबद्दल चौकशी करते. त्याचवेळी सायली प्रतिमाला घेऊन येते. त्यानंतर पूर्णा आजी स्वतःच्या हाताने प्रतिमाला जेवायला वाढतात. प्रतिमाला लोणचं व पोळी जेवायला आवडते म्हणून लोणचं व पोळी जेवायला वाढते. एकूणच घरात प्रतिमाच्या येण्याने आनंदी कुटुंब असतं.
तर दुसरीकडे, महीपत नागराजची चांगलीच खरडपट्टी करतो. खोट्या डेड बॉडीच प्रकरण तुमच्या अंगावर शेकेल आणि त्यामुळे मी सुद्धा अडकेन असं महीपत नागराजला सांगतो आणि धमकावतो. हे ऐकून नागराज खूप घाबरतो. रविराज प्रतिमाच्या खोट्या डेड बॉडीचा शोध घेईल या भीतीने नागराज सावधतेचा इशारा घेतो. तर इकडे सुभेदार कुटुंबातील सगळीच मंडळी जेवत असतात तेव्हा अर्जुनच जेवणाकडे लक्ष नसतं. हे पाहून कल्पना त्याला टोकते. यावर सायली अर्जुनला टोमणा मारते. तर एकीकडे प्रिया अर्जुनच्या प्रेमात धुंद झाली असून ती त्याच्याबरोबर लग्न करण्याची स्वप्न रंगवते.
प्रियाला नागराजचा फोन येतो. सुभेदारांच्या घरातील अपडेट्स बद्दल नागराज, प्रियाला विचारतो. प्रतिमाच्या, खोट्या डेड बॉडीच्या प्लॅनिंगची आठवण करुन देत नागराज, प्रियाला सावध करतो. तर इकडे प्रियामुळे अर्जुन- सायली यांच्यातील वाढ वाढत असतो. सायली समजून न घेता असं का वागत आहे या विचारात अर्जुन असतो. याबाबत तो सायलीलाही विचारतो. मात्र सायली यांना आता माझ्या मनातलंही कळत नाही असं म्हणत आणखी चिडते.
शेवटी अर्जुन बायकांच्या मनातील कसं ओळखावं असा प्रश्न प्रतापला करतो. यावर प्रताप उत्तर द्यायचं टाळत तुला याचं उत्तर मिळालं तर मला सांग असं सांगतो. अर्जुन, सायलीला समजावण्याचा प्रयत्न करतो पण ती काही केल्या ऐकत नाही. तेव्हा त्यांच्या खोलीत प्रिया येते. प्रियाला पाहून सायलीचा राग आणखी अनावर होतो. आता मालिकेत सायली-अर्जुनमधील हे भांडण केव्हा संपणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.