सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जीवे मारण्याच्या धमक्या, ट्रोलिंग आणि वाद; रुचिता जामदारची न ऐकलेली बाजू, UNKNOWN FACTS

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 22, 2026 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ruchita Jamdar Unknown Facts

रुचिता जामदारचे UNKNOWN FACTS

Ruchita Jamdar Unknown Facts : मराठी रिअॅलिटी शोच्या दुनियेत गेल्या काही महिन्यांपासून एक नाव सतत चर्चेत राहिलं ते म्हणजे रुचिता जामदार. स्पष्ट बोलणारी, भांडखोर स्वभावाची आणि स्वतःच्या मतावर ठाम असणारी ही तरुणी Bigg Boss Marathi च्या घरात आल्यापासून प्रेक्षकांच्या नजरेत भरली. काहींना ती खूप आवडली तर काहींनी तिच्यावर जोरदार टीका केली. पण या सगळ्या वादांच्या पलीकडे, रुचिता जामदारचा प्रवास मात्र खूप संघर्षातून तयार झालेला. महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये साध्या कुटुंबात रुचिताचा जन्म झाला. तिचं बालपण आर्थिक अडचणीत गेलं. घराची परिस्थिती फार मजबूत नव्हती. तिचे वडील कुटुंब चालवण्यासाठी साधी नोकरी करत होते, तर आई घर सांभाळत होती. मात्र या परिस्थितीतही तिच्या कुटुंबाने तिच्या स्वप्नांना कधी थांबू दिलं नाही.

लहानपणापासूनच रुचिताला नृत्याची खूप आवड होती. शाळेत असतानाच ती विविध डान्स स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागली. तिचा आत्मविश्वास आणि स्टेजवरील ऊर्जा पाहून लोक तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. हळूहळू ती बहुतेक स्पर्धा जिंकू लागली आणि तिच्या मनात एक मोठं स्वप्न तयार झालं टीव्हीवर स्वतःची ओळख निर्माण करण्याचं. या स्वप्नाचा पहिला मोठा टप्पा आला Dance Maharashtra Dance या लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शोमुळे. या शोमध्ये रुचिताने आपल्या दमदार परफॉर्मन्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिची मेहनत आणि टॅलेंट पाहून प्रेक्षकांनी तिला भरभरुन पाठिंबा दिला आणि अखेर ती या स्पर्धेची विजेती ठरली. या विजयामुळे तिचं नाव महाराष्ट्रभर पोहोचलं.

आणखी वाचा – रितेश देशमुखने ‘या’ अभिनेत्याला दिलं गोड सरप्राईज, गुढीपाडव्यादिवशी थेट कॉल केला आणि…; म्हणाला…

यानंतर रुचिताने आणखी एका रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला Mi Honar Superstar. या शोमध्येही तिने उत्कृष्ट परफॉर्मन्स देत फर्स्ट रनर-अप ठरली. या टप्प्यानंतर रुचिताचं नाव मराठी रिअॅलिटी शोच्या दुनियेत ओळखलं जाऊ लागलं. त्यानंतर तिचा प्रवास फक्त मराठी मनोरंजनापुरता मर्यादित राहिला नाही. ती एमटीव्हीवरील लोकप्रिय शो MTV Roadies मध्ये देखील सहभागी झाली. रोडीजमध्ये तिचा स्वभाव आणखी स्पष्टपणे समोर आला. स्ट्रेटफॉरवर्ड आणि कोणालाही न घाबरणारी. मात्र या शोदरम्यान तिला सोशल मीडियावर अनेक ट्रोलिंगचा सामना करावा लागला. इतकंच नाही तर काही लोकांनी तिला जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. रुचिताला काही प्रेक्षकांनी खूपच ट्रॉल केलं. त्यामुळे ती थोडी खचली सुद्धा पण या सगळ्या नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करत तिने आपला प्रवास सुरुच ठेवला.

View this post on Instagram

A post shared by RUCHITA JAMDAR (@ruchujamdar)

सोशल मीडियावरही रुचिताने आपली वेगळी ओळख तयार केली. तिचे डान्स रील्स, फॅशन पोस्ट आणि रिअॅलिटी शोचे व्हिडीओ पाहण्यासाठी हजारो लोक तिच्या प्रोफाइलला फॉलो करू लागले. आज तिचे इंस्टाग्रामवर लाखोंच्या घरात फॉलोअर्स आहेत. मात्र रुचिताचा सर्वात चर्चेत आलेला टप्पा म्हणजे Bigg Boss Marathi चं घर. या घरात प्रवेश केल्यानंतर ती लगेचच चर्चेचा विषय ठरली. कारण तिचा स्वभाव खूप स्पष्ट होता. तिला जे वाटायचं ते ती सरळ बोलायची. त्यामुळे घरातील अनेक स्पर्धकांशी तिचे वाद झाले.

आणखी वाचा – ‘वॉकर’ फेम मार्शल आर्ट्सच्या मास्टरचे निधन, वयाच्या ८६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, पोस्ट शेअर करत अक्षय कुमार भावुक

कधी टास्कदरम्यान वाद… कधी घरातील नियमांवरून भांडण… तर कधी वैयक्तिक आरोप. या सगळ्यामुळे रुचिता सतत चर्चेत राहिली. ‘बिग बॉस’च्या घरात तिची अनेक भांडणं आणि वाद झाल्यामुळे ती कायम चर्चेत होती. काही वेळा तिच्या बोलण्यावरून तिला टीकेलाही सामोरं जावं लागलं. तरीही ती आपल्या मतावर ठाम राहिली. अखेर कमी मतांमुळे रुचिता जामदारला ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडावं लागलं. घरातून बाहेर आल्यानंतरही तिने अनेक खुलासे केले. काही स्पर्धकांबद्दल तिने आपली नाराजी व्यक्त केली आणि शोमध्ये घडलेल्या काही गोष्टींवरही भाष्य देखील केलं. अनेक खुलासे केले आहेत. त्यामुळे सतत ती चर्चेचा विषय बनली. आज रुचिता जामदार ही मराठी रिअॅलिटी शोच्या दुनियेतलं एक ओळखीचं नाव बनली आहे. साध्या कुटुंबातून आलेली ही मुलगी डान्सच्या स्टेजपासून सुरू झालेला तीचा हा प्रवास रोडीजसारख्या शोपर्यंत पोहोचला आणि नंतर ‘बिग बॉस’च्या घरापर्यंत आला. वाद असो, टीका असो किंवा कौतुक पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे रुचिता जामदारला दुर्लक्ष करणं कोणालाही शक्य नाही. तिचा प्रवास अजूनही सुरु आहे. आणि पुढच्या काळात ती मनोरंजनाच्या दुनियेत आणखी काय कमाल करते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. रुचिता जामदार ही चर्चेचा विषय बनली आहे. ट्रोलिंग असो, वाद असो या काहीही रुचिताच नाव प्रेक्षकांच्या मनात कायमच राहणार आहे. ‘बिग बॉस’मुळे रुचिताची फॅन फॉलोविंग आणखी वाढल्याच दिसत आहे.

Tags: bigg boss marathimarathi actressmarathi entertainment newsRuchita Jamdar Unknown Facts
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
 the 50 grand finale

'The 50' च्या ट्रॉफीवर शिव ठाकरेने कोरलं नाव, फैजल-कृष्णाला हरवलं, लकी विनरला मिळाले ५० लाख

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.