बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

PIFF मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘बाप्या’ची चर्चा, येत्या १५ मे रोजी होणार प्रदर्शित, पोस्टर समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 21, 2026 | 4:40 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
 Bapya Movie 

PIFF मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट 'बाप्या'ची चर्चा, येत्या १५ मे रोजी होणार प्रदर्शित, पोस्टर समोर

 Bapya Movie  : आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवलेला आणि अनोख्या संकल्पनेमुळे चर्चेत असलेला ‘बाप्या’ हा आगळावेगळा मराठी चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. ‘’आपली यारी… गावावर भारी!’’ अशी हटके टॅगलाईन असलेला हा चित्रपट १५ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे नुकतेच प्रदर्शित झालेले पोस्टर सध्या सोशल मीडियावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे आणि या वेगळ्या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवत आहे. पोस्टरमध्ये पाठमोरी उभी असलेली व्यक्ती आणि तिला पाहून गावातील इतर पात्रांच्या चेहऱ्यावर उमटलेले आश्चर्य, कुतूहल आणि प्रश्नार्थक भाव अनेक प्रश्न निर्माण करतात. विशेष म्हणजे पोस्टरमधील ती पाठमोरी व्यक्ती म्हणजे अभिनेत्री राजश्री देशपांडे असल्याचे कळतेय. पण ती अशी का उभी आहे? तिच्या आगमनाने गावात एवढे आश्चर्य का निर्माण होते? आणि तिच्या येण्याने नेमके काय बदल घडणार आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप गूढ ठेवण्यात आली आहेत.

पोस्टरवरुन चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवण्यात आली आहे. मैत्री आणि नातेसंबंधांभोवती फिरणाऱ्या या वेगळ्या कथेत नेमके काय घडते, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ‘आपली यारी… गावावर भारी!’ ही ओळही या चित्रपटातील मैत्रीची ताकद आणि त्यातून घडणाऱ्या रंजक घटनांची झलक देते. या अनोख्या आणि हटके संकल्पनेवर आधारित चित्रपटात प्रतिभावान अभिनेता गिरीश कुलकर्णी झळकणार असून त्यांच्यासह राजश्री देशपांडे, देविका दफ्तरदार, श्रीकांत यादव आणि आर्यन मेंगजी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पोस्टरमुळेच चित्रपटाची कथा नेमकी काय असेल, या बाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

आणखी वाचा – “महिला आयोगातील जिजाऊंच्या फोटोला…”, डॉ. अमोल कोल्हेंची रुपाली चाकणकरवर बोचरी टीका, म्हणाले, “गुलामगिरी…”

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

समीर तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला ‘बाप्या’ हा चित्रपट मनोरंजनासोबतच आशयघन आणि वेगळ्या धाटणीच्या कथानकामुळे विशेष ठरणार आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने मोठे यश मिळवत पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (PIFF) मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असे तीन मानाचे पुरस्कार पटकावले आहेत. या तिहेरी सन्मानामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. दिग्दर्शक समीर तिवारी म्हणतात, ‘’हा चित्रपट मैत्री, नाती आणि त्यातून घडणाऱ्या रंजक प्रसंगांची एक वेगळी आणि अनोखी कथा आहे. प्रेक्षकांना हसवत-खेळवत एक वेगळा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘आपली यारी… गावावर भारी!’ ही ओळ या चित्रपटाचा आत्माच आहे.’’

आणखी वाचा – एक फ्लॅट, दोन कुटुंब आणि तुफान राडा; ‘सुपर डुपर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, गंमतीशीर संवाद लक्षवेधी

वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत ‘बाप्या’ चित्रपटाचे दिग्दर्शन समीर तिवारी यांनी केले असून मुत्कल तेलंग आणि समीर तिवारी निर्माते आहेत. राजश्री देशपांडेची ही रहस्यमय व्यक्तिरेखा नेमकी कशी आहे? तिच्या आगमनाने गावात असा खळबळजनक प्रतिसाद का उमटतो? आणि ‘आपली यारी… गावावर भारी!’ म्हणवणारी ही मैत्री नेमकी कोणती? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील दिवसांत समोर येतील, आणि त्याच वेळी या अनोख्या चित्रपटाचे आणखी काही पैलू उलगडत जातील.

Tags: Bapya Movieentertainmentmarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Ruchita Jamdar Unknown Facts

जीवे मारण्याच्या धमक्या, ट्रोलिंग आणि वाद; रुचिता जामदारची न ऐकलेली बाजू, UNKNOWN FACTS

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.