बुधवार, ऑगस्ट 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस’च्या घरातून महिन्याभरातच ‘या’ स्पर्धकाची EXIT, गेमप्लॅन करता आलाच नाही…

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 21, 2026 | 3:10 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 6

'बिग बॉस'च्या घरातून 'या' स्पर्धकाची EXIT

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६ मध्ये पुन्हा एकदा एलिमिनेशन होणार असल्याचं समोर आलं आहे. या आठवड्यात घरातून कोण बाहेर पडणार याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे. या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी एकूण सात स्पर्धक नॉमिनेट झाले होते. यात विशाल कोटियन, संस्कृती साळुंके, सागर कारंडे, रेवा कौरासे, प्रभू शेळके, राकेश बापट आणि दीपाली सय्यद यांचा समावेश होता. यापैकी बहुतांश सदस्य टास्कदरम्यान नॉमिनेट झाले होते.

तथापि, या सगळ्यामध्ये वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळत आहे. यावेळी घराबाहेर जाण्याची शक्यता ‘वाइल्ड कार्ड’ एन्ट्री म्हणून आलेल्या संस्कृती साळुंकेवर असल्याची चर्चा रंगली आहे. या आठवड्यात संस्कृतीचे घरातील अनेक सदस्यांशी वाद झाले होते. विशेषतः अनुश्री आणि प्रभूसोबतचे तिचे भांडण चांगलेच चर्चेत आले होते. या वादादरम्यान अनुश्रीने तिला थेट “तूच या आठवड्यात बाहेर जाणार” असंही सुनावलं होतं. दरम्यान, सोशल मीडियावर फिरणाऱ्या अपडेटनुसार, संस्कृती साळुंकेच दहाव्या आठवड्यात घराबाहेर पडली असल्याचं म्हटलं जात आहे. जर ही माहिती खरी ठरली, तर तिचा ‘बिग बॉस’मधील प्रवास फारच कमी होता.

आणखी वाचा – एक फ्लॅट, दोन कुटुंब आणि तुफान राडा; ‘सुपर डुपर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, गंमतीशीर संवाद लक्षवेधी

याचबरोबर ‘भाऊच्या धक्क्या’वर या आठवड्यात आणखी ड्रामा पाहायला मिळणार आहे. होस्ट रितेश देशमुख घरातील काही सदस्यांची खरडपट्टी काढताना दिसणार आहे. राखी सावंत आणि संकेत पाठक यांच्या वागणुकीवर तो नाराजी व्यक्त करणार असल्याची माहिती समोर आली आहे. जेवण वाया घालवल्याच्या प्रकारावरून राखीला शिक्षा होण्याची शक्यता केली जात आहे.

आणखी वाचा – एक फ्लॅट, दोन कुटुंब आणि तुफान राडा; ‘सुपर डुपर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, गंमतीशीर संवाद लक्षवेधी

Tags: Bigg Boss Marathi 6entertainment newsmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Munna Bhai Fame actor's Car Hits Two People
Entertainment

‘लगे राहो मुन्ना भाई’ फेम अभिनेत्याच्या कारची स्कूटरला धडक; दोन जण गंभीर जखमी

ऑगस्ट 18, 2026 | 2:05 pm
Govinda On Affair Rumours
Entertainment

“खरं प्रेम अस्तित्वात आहे का?”; कश्मीरा शाहच्या पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष, म्हणाली, “लग्न, प्रेम…”

ऑगस्ट 17, 2026 | 5:59 pm
Manjar Movie Poster Onkar Bhojane in lead role
Entertainment

तीन मित्र अन् मोठा गोंधळ; ‘मांजर’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, १८ सप्टेंबरला उलगडणार…

ऑगस्ट 13, 2026 | 5:18 pm
Swara Bhasker breaks silence on being trolled
Entertainment

“मुस्लिमाशी लग्न करून तुम्ही लठ्ठ आणि कुरुप झालात का?”, ट्रोलिंगवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, “सेक्सी मुली…”

ऑगस्ट 12, 2026 | 10:19 am
Next Post
 Bapya Movie 

PIFF मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट 'बाप्या'ची चर्चा, येत्या १५ मे रोजी होणार प्रदर्शित, पोस्टर समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.