सोमवार, मे 12, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Paaru Marathi Serial : ब्रँड अँबेसिडर असल्याचा पारूला मिळाला मोबदला, दिशा-दामिनीचा जळफळाट, नवीन डाव आखत पारूचा बदलाही घेणार अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 8, 2024 | 10:42 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Marathi Serial Update todays episode

पारू मालिकेत पारूला न्याय मिळावा म्हणून अहिल्यादेवींची हालचाल, दिशा-दामिनीला पाहवेना, याचाही घेणार बदला

Paaru Marathi Serial Update :  ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, एकीकडे अहिल्यादेवींनी सगळ्या त्यांच्या खास पाहुण्यांचा उत्तम पाहुणचार केलेला असतो. तर इकडे प्रीतम व आदित्य प्रियाशी बोलत असतात. तितक्यात अहिल्यादेवी तिथे येतात. अहिल्यादेवींना आदित्य सांगतो की, मला सुद्धा थोडं कामात लक्ष घालू दे आणि शाळेचा जो तुझा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यावर मला असं वाटतंय की प्रीतमनेच काम कराव. यावर प्रीतम नकार देतो मात्र आदित्य सांगतो हा माझा आदेश आहे, असं म्हणत प्रिया आणि तू दोघांनी मिळून या कामावर लक्ष द्या असं तो सांगतो आणि साईड बघायला जायला सांगतात. यावर अहिल्यादेवी ही आदित्यच्या म्हणण्यात मान डोलावतात.

तर इकडे अहिल्यादेवी सगळ्यांची नाश्त्यासाठी वाट पाहत असतात. तितक्यात प्रीतमला प्रियाचा फोन येतो म्हणून तो निघून जातो. प्रीतमशी प्रिया मनमोकळेपणाने बोलत असते आणि ती बोलताना प्रीतमच्या स्वभावाबद्दल, गुणदोषांबद्दल कौतुक करते. यावर प्रीतम सांगतो की, तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून तर बघा तुम्ही त्यांच्या प्रेमात पडला नाही आहात ना?, यावर प्रिया सांगते की, असं काही नाही आहे पण त्यांचा साखरपुडा झाला आहे. यावर प्रीतमला असं वाटतं की, प्रिया कुठेतरी त्याच्यात गुंतत चालली आहे. तितक्यात तिथं पारू येते. पारू सांगते की, मला माहित आहे तुम्ही प्रिया मॅडमशी बोलत आहात. त्यावर पारू प्रीतमला समजावण्याचा प्रयत्न करते आणि मी यासाठी तुम्हाला कधीच मदत करणार नाही असे सांगते. तर इकडे अहिल्यादेवी मारुती व पारूला बोलावून घेतात आणि घरातील सगळ्या मंडळींना बोलावतात.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : आर्या रांगडा गडी वैभवच्या प्रेमात, व्यक्त होताना ढसाढसा रडली, एकतर्फी प्रेमाची सुरुवात

पारूच्या हातात अहिल्यादेवी पेपर्स ठेवतात आणि सांगतात की, हे पेपर्स वाच आणि यावर सह्या कर. यावर पारुला समजत नाही की, नक्की हे पेपर्स कसले आहेत. तर दिशा दामिनी बोलतात की, कदाचित पारूला या कामावरुन काढून टाकलं असेल. यांनी आधीच हे करायला हवं होतं. यावर दिशा अहिल्यादेवींना सांगते की, तुमचा निर्णय योग्य होता आणि तुम्ही यापूर्वीच हा निर्णय घ्यायला हवा होता. मात्र ती नेमकं कशाबद्दल बोलते हे कोणालाच कळत नाही. त्यानंतर आदित्य पारूला सांगतो की, घाबरू नकोस पारू हे कंपनीच्या ब्रँड अँबेसिडर असल्याचे पेपर्स आहेत आणि त्याचा मोबदला हा तुला मिळायलाच हवा म्हणून हे पेपर्स आहेत. यावर अहिल्यादेवी सांगतात की, हो हे पेपर्स तेच आहेत ज्यामुळे तुझी दर महिना सॅलरी चालू होईल. हे ऐकल्यावर पारू सांगते की, याची काहीच गरज नाही आहे. यावर अहिल्यादेवी सांगतात तू आमच्या घरात काम करतेस त्याचाही एक रुपया घेत नाहीस कारण तुला माझी सेवा करायची आहे आणि ज्या गोष्टीसाठी तू आमच्या कंपनीसाठी काम करते ज्याच्यातून आम्हाला करोडोंचा फायदा आहे त्याचा मोबदला हा तुला मिळायलाच हवा. यावर दिशा दामिनीचा चेहरा पडतो. दिशा मुद्दाम म्हणते की, हो आता तू स्वावलंबी व्हायला हवं, कारण आता तर तुझा नवरा पण नाही आहे. त्यामुळे तुझा घर खर्च, तुझा खर्च कसा भागवणार, आणि यासाठी थोडे पैसे तू साठवायला हवेत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : सूरज, पॅडी, निखिल व योगितावर नॉमिनेशनची टांगती तलवार, घरातील स्पर्धकांकडूनच झाले नॉमिनेट, कोण जाणार घराबाहेर?

हे ऐकल्यावर अहिल्यादेवी रागाने तिच्याकडे पाहू लागतात. त्यानंतर दिशा व दामिनी त्यांच्या रूममध्ये येतात आणि दामिनी दिशाला डिवचते की, पारूची जागा खरं तर तू घ्यायला हवी होतीस. ब्रँड अँबेसिडर तू असायला हवी होतीस पण ती जागा पारूने घेतली. यावर दिशा म्हणते की, आता मी त्या पारूचा बंदोबस्त करते. आता दिशा व दामिनी पारूचा बदला कसा घेणार हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल

Tags: marathi serialpaaru marathi serial updatePaaru Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Martyr Surendra Moga Daughter
Social

वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, “बदला घेईन”

मे 12, 2025 | 4:23 pm
Rakesh Poojary Death
Entertainment

अवघ्या तिशीत सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, मित्राच्या मेहंदीमध्ये नाचला, मित्रांसह मस्करी केली अन्…

मे 12, 2025 | 4:05 pm
Vaama Ladhai Sanmanachi
Entertainment

मराठीत ‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपटाची चर्चा, स्त्रियांचा संघर्ष अधोरेखित करणारं कैलास खैर यांच्या आवाजातील गाणं प्रदर्शित

मे 12, 2025 | 3:39 pm
bharti singh family in Amritsar
Entertainment

भारत-पाकिस्तान तणावात अमृतसरमध्ये भारती सिंहचं कुटुंब, स्वतः थायलंडला जाताच ट्रोल, खूप रडली अन्…

मे 12, 2025 | 2:05 pm
Next Post
Tharal Tar Mag Serial todays episode

Tharal Tar Mag Serial :  प्रतिमाची स्मृती परत आणण्यात सुभेदार कुटुंब यशस्वी ठरणार का?, तर तन्वीमुळे सायली-अर्जुनमधील वाद वाढणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.