शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “बिना आई बापाचं पोर…”, ‘बिग बॉस’च्या घरात केर काढणाऱ्या सूरज चव्हाणला महाराष्ट्राचा पाठिंबा, म्हणाले, “खोटं वागता येत नाही म्हणून…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 9, 2024 | 11:50 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Update

'बिग बॉस मराठी' सीझन ५ च्या घरात सूरज चव्हाणला केर काढताना पाहून नेटकरी भावुक

Bigg Boss Marathi 5 Update : ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाच्या या सीझनमध्ये गोलीगत सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गोलीगत सूरजला ‘बिग बॉस मराठी’चा खेळ कळलाच नाही, असंही अनेकजण म्हणू लागले. पण त्याने स्वत:वर मेहनत घेतली आणि आपला खेळ दाखवायला सुरुवात केली. ‘बिग बॉस’ यांनी स्वतः सूरजला पाठिंबा दिलेला पाहायला मिळाला. वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनेदेखील सूरजच्या खेळाचं कौतुक केलं. तसेच त्याला यापुढेही गोलीगत पॅटर्नने खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये गोलीगत सूरज चव्हाण गार्डन एरियामध्ये केर काढताना दिसत आहे. त्यावर ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता प्रभू वालावलकर आणि हास्यसम्राट पंढरीनाथ कांबळे चर्चा करताना दिसत आहेत. अंकिता म्हणते, “सूरजला असं बघून मला कसंतरी वाटतं”. त्यावर पॅडी म्हणतो,”बिचारा बाहेरदेखील हेच काम करत असेल. तो काल मला म्हणालेला, दादा मला खूप वाईट वाटतं मी वर झोपतो आणि तुम्ही खाली झोपता”. त्यावर अंकिता म्हणते,”सूरजला गेम कळला नाही, पण माणसं कळली”.

आणखी वाचा – Tharal Tar Mag Serial : प्रतिमाची स्मृती परत आणण्यात सुभेदार कुटुंब यशस्वी ठरणार का?, तर तन्वीमुळे सायली-अर्जुनमधील वाद वाढणार

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

टिक टॉकच्या राज्यात लोकप्रियतेस आलेला गोलीगत सूरज चव्हाणचं नेटकऱ्यांकडून चांगलच कौतुक होत आहे. अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण आता बिग बॉस मराठीचं घरदेखील गाजवत आहे. सूरजच्या समोर आलेल्या या प्रोमोवर कलाकारांसह, नेटकऱ्यांनीही कमेंट करत त्याला भरभरुन पाठिंबा दिला आहे. सूरजच्या या नव्या प्रोमोवर, “बिना आई बापाचं पोर आहे ते जनतेने आईबाप बनून आशीर्वाद द्यावे आणि सूरज चव्हाणला वोट करावे”, “ज्याच्यामुळे शोचा TRP वाढला असा एकमेव स्पर्धक म्हणजे सूरज”, “सूरजला खोटं वागता येत नाही म्हणून तो आज लाखो लोकांच्या हृदयावर अधिराज्य करत आहे”, असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – “गेम कळला नाही पण…”, Bigg Boss च्या घरात कचरा, धुनी-भांडी करतो सूरज चव्हाण, काही स्पर्धकही भावुक, पण कमी लेखणं का?

तर याशिवाय काहींनी, “गावकडच्या मातीतला माणूसकी जपणारा माणूस”, “गेम कळो न कळो पण आमच्या सूरज भाऊमुळे घरातल्या सर्व सदस्यांना माणसातील माणुसकी हे नक्कीच कळले असेल”, “हा व्हिडीओ पाहून अक्षरश अंगावर काटा आला. सूरजमध्ये खूप माणुसकी आहे. सूरज तू पूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकलं आहेस. तुझ्यामुळे जे ‘बिग बॉस’ पाहत नव्हते ते हा कार्यक्रम पाहायला लागले”, “माणसं कळली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील माणसं कमावली”, अशा कमेंट करत त्याला पाठिंबा दर्शविला आहे.

Tags: bigg boss marathiBigg Boss Marathi 5 UpdateSuraj Chavan Bigg boss marathi journey
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan removing the garbage Utkarsh Shinde special post for him

Bigg Boss Marathi च्या घरात सूरजला कचरा काढताना पाहून हळहळला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, म्हणाला, "एकटा राहतो...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.