सोमवार, जून 2, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Tharal Tar Mag Serial : प्रतिमाच्या खोट्या डेड बॉडीच्या प्रकरणाचा खुलासा, प्रिया-नागराजचं सत्य उघडकीस येणार?, सायली-अर्जुनमध्ये पुन्हा वाद

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 9, 2024 | 11:10 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tharal Tar Mag Serial Update

ठरलं तर मग मालिकेत तन्वीमुळे सायली-अर्जुनमध्ये पुन्हा वाद, डेड बॉडी प्रकरणही येणार समोर

Tharal Tar Mag Serial Update :  ‘ठरलं तर मग’ मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहे. मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळत आहे की, अर्जुन आल्या आल्या रविराजला प्रतिमाच्या खोट्या डेड बॉडी बद्दल विचारतो. तर इकडे सायली दिसत नसल्याने पूर्णा आजी तिच्याबद्दल चौकशी करते. त्याचवेळी सायली प्रतिमाला घेऊन येते. त्यानंतर पूर्णा आजी स्वतःच्या हाताने प्रतिमाला जेवायला वाढतात. प्रतिमाला लोणचं व पोळी जेवायला आवडते म्हणून लोणचं व पोळी जेवायला वाढते. एकूणच घरात प्रतिमाच्या येण्याने आनंदी कुटुंब असतं.

तर दुसरीकडे, महीपत नागराजची चांगलीच खरडपट्टी करतो. खोट्या डेड बॉडीच प्रकरण तुमच्या अंगावर शेकेल आणि त्यामुळे मी सुद्धा अडकेन असं महीपत नागराजला सांगतो आणि धमकावतो. हे ऐकून नागराज खूप घाबरतो. रविराज प्रतिमाच्या खोट्या डेड बॉडीचा शोध घेईल या भीतीने नागराज सावधतेचा इशारा घेतो. तर इकडे सुभेदार कुटुंबातील सगळीच मंडळी जेवत असतात तेव्हा अर्जुनच जेवणाकडे लक्ष नसतं. हे पाहून कल्पना त्याला टोकते. यावर सायली अर्जुनला टोमणा मारते. तर एकीकडे प्रिया अर्जुनच्या प्रेमात धुंद झाली असून ती त्याच्याबरोबर लग्न करण्याची स्वप्न रंगवते.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : ब्रँड अँबेसिडर असल्याचा पारूला मिळाला मोबदला, दिशा-दामिनीचा जळफळाट, नवीन डाव आखत पारूचा बदलाही घेणार अन्…

प्रियाला नागराजचा फोन येतो. सुभेदारांच्या घरातील अपडेट्स बद्दल नागराज, प्रियाला विचारतो. प्रतिमाच्या, खोट्या डेड बॉडीच्या प्लॅनिंगची आठवण करुन देत नागराज, प्रियाला सावध करतो. तर इकडे प्रियामुळे अर्जुन- सायली यांच्यातील वाढ वाढत असतो. सायली समजून न घेता असं का वागत आहे या विचारात अर्जुन असतो. याबाबत तो सायलीलाही विचारतो. मात्र सायली यांना आता माझ्या मनातलंही कळत नाही असं म्हणत आणखी चिडते.

आणखी वाचा – “गेम कळला नाही पण…”, Bigg Boss च्या घरात कचरा, धुनी-भांडी करतो सूरज चव्हाण, काही स्पर्धकही भावुक, पण कमी लेखणं का?

शेवटी अर्जुन बायकांच्या मनातील कसं ओळखावं असा प्रश्न प्रतापला करतो. यावर प्रताप उत्तर द्यायचं टाळत तुला याचं उत्तर मिळालं तर मला सांग असं सांगतो. अर्जुन, सायलीला समजावण्याचा प्रयत्न करतो पण ती काही केल्या ऐकत नाही. तेव्हा त्यांच्या खोलीत प्रिया येते. प्रियाला पाहून सायलीचा राग आणखी अनावर होतो. आता मालिकेत सायली-अर्जुनमधील हे भांडण केव्हा संपणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

Tags: marathi serialtharal tar magTharal Tar Mag Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Vaishnavi Hagawane Death
Entertainment

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ कोणाजवळच राहीना, आईविना लेकराचे रडून-रडून हाल, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

जून 2, 2025 | 5:00 pm
Radhika Apte Motherhood
Entertainment

बाळ होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत केलं काम, अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतील सत्य, म्हणाली, “इथं काम करणं…”

जून 2, 2025 | 3:30 pm
Gauahar Khan on suniel Shetty
Women

“सी-सेक्शन म्हणजे आराम”, सुनिल शेट्टींच्या वक्तव्यावर भडकली सुप्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली, “अनुभवलं नाही मग बोलले कसे?”

जून 2, 2025 | 2:51 pm
 Heeramandi Actress Sharmin Segal
Entertainment

‘हिरामंडी’ फेम अभिनेत्री झाली आई, गोंडस मुलाला दिला जन्म, कुटुंबात जंगी सेलिब्रेशन

जून 2, 2025 | 2:07 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Update

Bigg Boss Marathi : "बिना आई बापाचं पोर…", 'बिग बॉस'च्या घरात केर काढणाऱ्या सूरज चव्हाणला महाराष्ट्राचा पाठिंबा, म्हणाले, "खोटं वागता येत नाही म्हणून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.