बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘हिरामंडी’ फेम अभिनेत्री झाली आई, गोंडस मुलाला दिला जन्म, कुटुंबात जंगी सेलिब्रेशन

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 2, 2025 | 2:07 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
 Heeramandi Actress Sharmin Segal

'हिरामंडी' फेम अभिनेत्री झाली आई, गोंडस मुलाला दिला जन्म, कुटुंबात जंगी सेलिब्रेशन

Heeramandi Actress Sharmin Segal : ‘हिरामंडी’ अभिनेत्री शर्मिन सेहगलने नुकतीच तिच्या चाहत्यांसह आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्री आई झाली असल्याची गोड बातमी समोर आली आहे. पत्रकार विक्की ललवानी यांनी सांगितले आहे की संजय लीला भन्साळीच्या भाचीने म्हणजेच शर्मिन सेहगलने २८ मे २०२५ रोजी एका मुलाला जन्म दिला. तिने पती अमन मेहता यांच्याबरोबर त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले आहे. तथापि, या जोडप्याने या आनंदाच्या बातमीबाबत सोशल मीडियावर काहीही सांगितलेले नाही. शिवाय कोणतीही अधिकृत घोषणाही केलेली नाही. परंतु या वृत्तानुसार, शर्मिन व अमन यांच्या घरी चिमुकल्या बाळाचे आगमन झाले आहे.

शर्मिन सेहगलने अमन मेहता यांच्याशी लग्न केले. अमन हे टोरेंट ग्रुपची सहायक कंपनी टोरेंट फार्मास्यूटिकल्स मध्ये एग्जीक्यूटिव डायरेक्टर या पदावर कार्यरत आहेत. या जोडप्याने नोव्हेंबर २०२४ मध्ये इटलीमध्ये लग्न केले. या लग्नात कुटुंबातील जवळच्या लोकांचा समावेश होता. यानंतर, अभिनेत्री गुजरातमधील अहमदाबादला गेली आणि नंतर मुंबईला परतली आणि सध्या हे जोडपे मुंबईत राहत आहेत. शर्मिन आणि अमन याचबरोबर संजय लीला भन्साळी आणि तिचे आई-वडील दीपक आणि बेला भन्साली सेहगल यांच्यासह भन्साली कुटुंब मुलाच्या आगमनाने खूष आहे.

आणखी वाचा – प्रिन्स नरुला व युविका चौधरीच्या घरी चोरी, मौल्यवान वस्तू लंपास, घरकाम करणाऱ्या महिलेचाच डाव

View this post on Instagram

A post shared by Sharmin Segal Mehta (@sharminsegal)

शर्मिन सेहगल यांनी संजय लीला भन्साळीच्या नेटफ्लिक्सवरील ‘हिरामंडी’ या वेबसीरिजमध्ये काम केले. त्यात त्यांच्या अभिनयाची खूप खिल्ली उडविली गेली. या वेबसीरिजनंतर अभिनेत्रीला बराच ट्रोलिंगचा सामना करावा लागला. तिच्या व्यक्तिरेखेचे ​​नाव अलमजेब असे होते, तर या पात्राच्या आईची भूमिका मनीषा कोइराला हिने सांभाळली. ‘मलाल’ या चित्रपटातून तिने २०१९ पासून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटाची निर्मितीही संजय लीला भन्साली यांनी केली होती.

आणखी वाचा – सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सुरु केला स्वत:चा नवीन व्यवसाय, आईसाठी अभिनेत्याची खास पोस्ट, म्हणाला, “हे नवं दुकान…”

View this post on Instagram

A post shared by Sharmin Segal Mehta (@sharminsegal)

शर्मिन सेहगलचा चित्रपट
अभिनेत्री होण्यापूर्वी शर्मिन सेहगल हिने दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग स्टारर ‘बाजीराव मस्तानी’ मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. कॅमेरामागील कामकाजाच्या शैलीचा अनुभवही तिला आहे. ती ‘अतिथि भूतो भव’ या भयपट-कॉमेडीमध्येही दिसली. जिथे तिने जॅकी श्रॉफ आणि प्रतीक गांधी यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली.

Tags: bollywood actressheeramandisharmin segal
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Next Post
Gauahar Khan on suniel Shetty

“सी-सेक्शन म्हणजे आराम”, सुनिल शेट्टींच्या वक्तव्यावर भडकली सुप्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली, “अनुभवलं नाही मग बोलले कसे?”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.